शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
3
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
4
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
5
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
6
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
7
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
9
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
10
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
11
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
12
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
13
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
14
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
15
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
16
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
17
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
18
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
19
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
20
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल

परमपावन दलाई लामांना अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 3:04 AM

अवघ्या विश्वाचे छप्पर असलेल्या शांती व अहिंसाप्रिय देशावर शेजारच्या बलाढ्य चीन देशाने आक्रमण करून साठ लाख लोकसंख्येवर परवशतेचे पाश आवळले.

- प्रा. डॉ. भाऊ लोखंडेअवघ्या विश्वाचे छप्पर असलेल्या शांती व अहिंसाप्रिय देशावर शेजारच्या बलाढ्य चीन देशाने आक्रमण करून साठ लाख लोकसंख्येवर परवशतेचे पाश आवळले. या बौद्ध धर्मीय देशाचे धर्मप्रमुख व राष्ट्रप्रमुख म्हणून परमपावन दलाई लामांचा पराकोटीचा सन्मान व पूजा केली जाते. ते स्वत:ला एक साधा बौद्ध भिक्षू म्हणतात. परंतु जनता मात्र त्यांना तिबेटी भाषेत ‘येशी नोरबू’ म्हणजे मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी’ म्हणतात. ‘दलाई लामा’ या मंगोल संज्ञेचा अर्थ ‘ज्ञान प्रज्ञेचा सागर’ असा होतो. त्यांना अवलौकितेश्वरा (चेन-रेजी) चा साक्षात अवतार किंवा कारुण्य सिंधू मानतात.रदार, देश, राज्य हिरावून निर्वासितांचे जगणे वाट्याला आले तरी त्यांच्या चर्येवरील तेज, शांती व संयम ढळला नाही. त्यांनी तिबेटी बांधवांना भारतात कृतज्ञपणे सन्मानाने जगायला शिकवले. कमी उत्पन्नात, कमी खर्चाचा व गरजांचा मेळ बसवून समाधानाने धर्माचरण करीत जगायला शिकवले. त्यांच्या ऐतिहासिक ‘न भूतो न भविष्यती’ अशा विश्वशांतीच्या कार्याचा गौरव मानाचा मुजरा करण्यासाठी जेव्हा दलाई लामांना ‘नोबेल पुरस्कार’ देण्यात आला तेव्हा ते निरपेक्ष शांतपणे म्हणाले, ‘या पुरस्कारामुळे माझा अहिंसक आंदोलनावर अधिक विश्वास बळावला. या पुरस्काराची राशी मी जगात अन्नाविना जगणाऱ्या असहाय उपाशी लोकांसाठी खर्च करायला देईन. माझ्या तिबेटी लोकांना पैशाची गरज नाही, असे नाही; परंतु जगाच्या पाठीवर कुणीही तिबेटी उपाशी झोपत नाही. म्हणून मी ही राशी जगातील अभावग्रस्त गरीब दु:खितांसाठी उपयोगात आणीन. यावरून ‘न त्वमहं राज्यं न स्वर्ग न पुनर्भवम्। काम ये दु:खतप्चांना प्राणिनां अर्तविनाशनम्।या राज्य, स्वर्ग, पुनर्जन्म नाकारून दु:खपीडित प्राण्यांच्या दु:खाचा विनाश अपेक्षिणाºया करुणेच्या सागराच्या बोधिसत्त्वाच्या मंगलमैत्रीचा अनुभव येतो. भारताने दलाई लामांना देऊन तिबेटी व जगातील मानवताप्रेमी जनतेची सहानुभूती व शाबासकी मिळविली. ब्रिटिशांच्या राज्यात तिबेट हे बफरस्टेट होते. चीन व भारताच्या सैन्यतुकड्या तिबेटमध्ये ठेवल्या जात. त्यामुळे भारताच्या सीमा सुरक्षित होत्या; परंतु हिंदी चिनी भाई-भाई म्हणत माओ व चाऊ एन लाईनने भारताला धोका देण्यासाठी ‘पंचशीला’चा वापर केला आणि तिबेटवर चीनचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संसदेत धोक्याचा इशारा देत म्हणाले होते ‘भारत सरकारने तिबेटवर चीनचे सार्वभौमत्व मान्य करून घोडचूक केली. तिबेटला बफरस्टेटच राहू द्यायला पाहिजे होते; परंतु आता भारताच्या सीमेबरोबर चीनची सीमा जोडली गेली. चीनचा इतिहास हा आक्रमणाचा इतिहास  आहे.भारताने खºया अर्थाने शांती, अहिंसा, धर्मसहिष्णुता, बंधुभावाची उदात्त मूल्ये बुद्धगयेतून जगाला दिली आहेत. त्यांचा परमपावन दलाई लामा आपल्या अमृतवाणीने पुनरुच्चार व प्रबोधन करून भारतात समता, स्वातंत्र्य व बंधुतेचा संदेश देऊन उपकृत करतील, अशी अपेक्षा व आकांक्षा आहे. या ग्लोबल परिषदेतून ‘सर्वधर्म सहिष्णुता व मानवतेचा जयजयकार हाईल आणि सब्बे सत्ता सुखी होन्तू। मा कंचि दु:खमागमा’ या पसायदानाबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा मंगलमैत्रीचा संदेश गगनात निनादेल अशी मंगलकामना आहे.(लेखक हे प्रसिद्ध बौद्ध विद्वान वआंबेडकरी विचारवंत आहेत.)

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाMaharashtraमहाराष्ट्र