शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

घरातूनच करा बाबासाहेबांना अभिवादन

By | Updated: December 4, 2020 04:13 IST

सहा डिसेंबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त दरवर्षी भडकल गेट तसेच विद्यापीठ गेटसमोरील पुतळ्याजवळ तसेच ...

सहा डिसेंबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त दरवर्षी भडकल गेट तसेच विद्यापीठ गेटसमोरील पुतळ्याजवळ तसेच शहरांतील विहारांमध्ये हजारो अनुयायी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत असतात. यंदा कोरोनाचा सामना करण्यासाठी समाजबांधवांसह पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी अनुयायांनी आपल्या घरातच बाबासाहेबांना अभिवादन करावे. समाज माध्यमावर यासंबंधीचे फोटो किंवा चलचित्र टाकावेत, बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ, विहारांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी ५० व्यक्तींपेक्षा जास्त अनुयायांनी गर्दी करू नये, आपापल्या घरातच बुद्धवंदना, त्रिशरण पाठ घेऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवाद करावे व शासनाने हाती घेतलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यास हातभार लावावा, असे आवाहन समाजातील जाणकारांनी केले आहे.

विद्यापीठातही मर्यादित स्वरूपात अभिवादन कार्यक्रम

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या हस्ते सकाळी १० वाजता अभिवादन केले जाणार असून, यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियम व अटींचे पालन करून मोजकेच संवैधानिक अधिकारी व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.

सायंकाळी ६ वाजता एकाचवेळी अभिवादन

जयेश तुषार मोरे, वनिता मोरे, दौलत मोरे, डॉ. ऋषिकेश कांबळे, निवृत्त न्या. अजिंक्य कांबळे, प्रा. प्रताप कोचुरे व अन्य काही समाजबांधवांनी आठ दिवसांपासून शहरात एक मोहीम राबविली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भडकल गेट येथे आंबेडकरी अनुयायांनी गर्दी न करता आपापल्या घरात, वस्त्यांमध्ये, कार्यालयामध्ये सायंकाळी ६ वाजता उभे राहून एकाचवेळी बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे या मोहिमेद्वारे आवाहन केले आहे. भडकल गेट येथे पोलीस बँण्ड पथक व मोजक्याच अनुयायांच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन केले जाणार आहे.