शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांचे ७५ टक्के व्याज माफ; औरंगाबादमधील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 18:33 IST

व्याजाची ७५ टक्केरक्कम माफ करून १ एप्रिलपासून अभय योजना राबविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

औरंगाबाद : शहरातील सव्वालाखाहून अधिक मालमत्ताधारकांना महापालिकेने वेळेवर कर न भरल्याने शास्ती आणि विलंब शुल्क लावला आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढतच आहे. व्याजाची ७५ टक्केरक्कम माफ करून १ एप्रिलपासून अभय योजना राबविण्याचा निर्णय सोमवारी रात्री उशिरा सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीत २५२ कोटी रुपये येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अभय योजनेची माहिती देताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, २०१६-१७ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराचे उद्दिष्ट २३९ कोटी ठेवण्यात आले होते. मनपाला फक्त ८९ कोटी ३५ लाख रुपये मिळाले. मनपाकडून लावण्यात येणारा दंड आणि व्याजामुळे नागरिक कर भरण्यास तयार नाहीत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ९० कोटी मूळ मागणीवर विलंब शुल्क २५ कोटी ३४ लाख आणि शास्ती ९५ कोटी ४६ लाख रुपये आकारणी केली. त्यामुळे थकबाकीचा आकडा २२२ कोटी १६ लाखांवर पोहोचला.

मालमत्ता कराची वसुली ९० टक्के झालीच पाहिजे, असे शासनाने बंधनकारक केले आहे. दरवर्षी मनपाकडून फक्त २० ते २२ टक्केच वसुली होते. शास्ती आणि विलंब शुल्क ७५ टक्के माफ केल्यास नागरिक उत्स्फूर्तपणे मालमत्ता कर भरतील, असा अंदाज महापालिकेला आहे. एखाद्या नागरिकाचा मूळ मालमत्ता कर २५ हजार असेल, तर त्यावर दंड, व्याज मिळून रक्कम ६० ते ७० हजारांपर्यंत करण्यात आलेली आहे. यात ७५ टक्केरक्कम माफ झाल्यास नागरिक आनंदाने कर भरतील. पुणे महापालिकेने मालमत्ता करासंदर्भात अभय योजना राबविली आहे. नागरिकांना प्रोत्साहन मिळाल्यास निश्चितच मालमत्ता कराचा आलेख उंचावेल, असा आशावाद महापौर नंदकुमार घोडेले  यांनी  व्यक्त केला. 

शासन मंजुरीच्या अधीन ठरावमालमत्ता करासंदर्भात अभय योजना राबविण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव महापालिकेने १६ जून २०१७ रोजी शासनाकडे पाठविला आहे. अद्यापपर्यंत शासनाने याला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे शासनाच्या निर्णयाची वाट न पाहता शासन निर्णयाच्या अधीन राहत सोमवारी रात्री महापालिकेने अभय योजना राबविण्याचा ठराव मंजूर केला.  या ठरावाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१८ ते ३१ मे २०१८ पर्यंत करण्यात येणार आहे. कर सवलत दिल्याने दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात कराचा भरणा नागरिक करतील,   अशी अपेक्षा महापालिकेला  आहे.

जनजागृती करणारमालमत्ता कर थकबाकीदारांची यादीच महापालिका वेबसाईटवर टाकणार आहे. त्याचप्रमाणे वर्तनपत्रांमध्ये जाहिराती देऊनही करभरणा करण्यासाठी जनजागृती करण्यात येईल. योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी आल्यास आयुक्तांनी प्रशासकीय स्तरावर निर्णय घेण्याचे       अधिकारही सर्वसाधारण सभेने दिले.

योजनेचे स्वरूप असे - २२२ कोटी- ३१ मार्च २०१७ पर्यंत थकबाकी- १२० कोटी- विलंब शुल्क व शास्ती- ३४२ कोटी- एकूण थकबाकी- ९० कोटी- ७५ टक्क्यांप्रमाणे होणारे नुकसान - २५२ कोटी- महापालिकेच्या तिजोरीत येतील

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरMONEYपैसाcommissionerआयुक्त