छत्रपती संभाजीनगर: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता तिरुपती-साईनगर शिर्डी-तिरुपती दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीच्या एकूण १८ फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. या विशेष गाड्या छत्रपती संभाजीनगरमार्गे धावणार आहेत, ही भाविकांसह स्थानिक प्रवाशांसाठी महत्त्वाची सोय ठरणार आहे.
गाडी क्रमांक 07637 – तिरुपती ते साईनगर शिर्डी विशेष गाडीही गाडी तिरुपती येथून ऑगस्ट महिन्यात ३, १०, १७, २४, ३१ तारखेला आणि सप्टेंबर महिन्यात ७, १४, २१, २८ या तारखेला दर रविवारी सकाळी ०४.०० वाजता सुटेल. ही गाडी रेणीगुंटा, गुडूर, नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, परळी वैजनाथ, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नगरसोल, मनमाड, कोपरगावमार्गे सोमवारी सकाळी १०.४५ वाजता साईनगर शिर्डीला पोहोचेल.
गाडी क्रमांक 07638 – साईनगर शिर्डी ते तिरुपती विशेष गाडी :ही गाडी साईनगर शिर्डी येथून ऑगस्ट महिन्यात ४, ११, १८, २५ तारखेला आणि सप्टेंबर महिन्यात १, ८, १५, २२, २९ या तारखेला दर सोमवारी सायंकाळी १९.३५ वाजता सुटेल आणि बुधवारी मध्यरात्री ०१.३० वाजता तिरुपतीला पोहोचेल.
छत्रपती संभाजीनगरकरिता विशेष वेळा :- तिरुपती ते शिर्डी (07637) ही रेल्वेगाडी छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी पहाटे ०५.१५ वाजता पोहचेल तर ०५.२० वाजता प्रस्थान घेईल.- तर शिर्डी ते तिरुपती (07638) गाडी छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी रात्री २३.१० वाजता येईल आणि २३.१५ वाजता रवाना होईल.
भाविकांसह प्रवाशांची सोयया गाड्यांमध्ये २ एसी, ३ एसी, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणी मिळून एकूण १८ डब्बे असतील. या विशेष गाड्यांमुळे छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, परळी वैजनाथ, सिकंदराबाद आदी मार्गावरचे प्रवासी आणि भाविक तिरुपती व शिर्डी यात्रा सुलभपणे करू शकणार आहेत.