शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

हातातोंडाशी आलेला घास हिसकावला: वादळाच्या तडाख्याने केळीची बाग उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 11:49 IST

  गांधेलीतील घटना : काढणीसाठी आली होती केळी, क्षणात झाले होत्याचे नव्हते; शेतकरी आर्थिक संकटात  औरंगाबाद : पावसाने दगा ...

 

गांधेलीतील घटना : काढणीसाठी आली होती केळी, क्षणात झाले होत्याचे नव्हते; शेतकरी आर्थिक संकटात औरंगाबाद : पावसाने दगा दिल्याने दुष्काळाचे संकट, पाण्याची परिस्थितीही गंभीर, पैशांची अडचण तर पाचवीला पुजलेली. तरीही या सगळ्यांवर मात करून शेतात केळी पिकाची लागवड केली. लेकराप्रमाणे बाग जोपासली. काही दिवसांत काढणीला आलेली केळी भरघोस उत्पन्न देणार होती. परंतु वादळी वाºयाने केळीची बाग आडवी केली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. या अस्मानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.गांधेली येथील शेतकरी सय्यद अख्तर सय्यद शब्बीर यांच्यावर हे संकट कोसळले आहे. गांधेलीत २ एकरपैकी काही क्षेत्रात त्यांनी केळीची जवळपास २ हजार झाडे  लावली होती. अल्प पावसामुळे पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ ओढावली. अशा परिस्थितीत ठिंबक सिंचनाचा वापर करून केळीची बाग जोपासली. रात्रीचा दिवस करून बाग वाढविली. बाग चांगली फुलली होती. गेल्या काही दिवसांत केळी काढण्यालायक झालेली होती. त्यामुळे आगामी काही दिवसांत झाडांवरून केळी काढण्याची तयारी सुरू होती. त्यातून येणाºया रकमेतून विविध कामे करण्याचे स्वप्नही रंगले होते. मात्र, निसर्गाला हे मान्य नव्हते. रणरणत्या उन्हात २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा सुटला. या वाºयाने त्यांची केळीची बाग अवघ्या काही क्षणात आडवी झाली. झाडांवरील केळीचे घड जमिनीवर कोसळले. त्यामुळे डाग लागल्याने ही केळी कोणी घेण्यास तयार नाही. या आपत्तीची पाहणी, पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी तहसील कार्यालयाकडे केली आहे. 

१.२० लाखांच्या उसनवारीतून बागसय्यद अख्तर यांनी केळीच्या बागेसाठी नातेवाईकांकडून १.२० लाख रुपये उसने घेतले होते. स्वत: जवळचे ८० हजार, असे २ लाख रुपये बागेसाठी खर्च केले. अवघ्या काही दिवसांत किमान ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार होते. परंतु वादळी वाºयामुळे हे उत्पन्न हातातून गेले. आता नातेवाईकांचे उसने पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाचा तडाखाउन्हामुळे केळी बागेला तडाखा बसत होता. पाणीपातळी खोल गेल्याने आधीच मेटाकुटीला आलो होतो. उष्णतेचे संकट केळीला मारक ठरत होते. त्यात कशीबशी तग धरून बाग वाढविली. मात्र पैसा, मेहनत वाया गेल्याचे सय्यद अख्तर सय्यद शब्बीर म्हणाले.

 

टॅग्स :Natureनिसर्गMedicalवैद्यकीय