शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या चार वर्षाच्या नातीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम आजोबाला २० वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 19:03 IST

सत्र न्यायालयाने पोक्सो आणि भादंवि कायद्यांतर्गत ठोठावली शिक्षा

औरंगाबाद : अवघ्या चार वर्षाच्या नातीसोबत अश्लील चाळे करून, तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम ५६ वर्षीय चुलत आजोबाला सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सोमवारी २० वर्षे सश्रम कारावास आणि विविध कलमांखाली १५ हजार रुपये दंड ठोठावला.

पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे ती मुलीसह आईकडे माहेरी राहत होती. ती मोलमजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. २८ ऑगस्ट २०१६ रोजी सायंकाळी ती कामावरून घरी आली. त्यावेळी महिलेच्या आईने सांगितले की, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास महिलेचा चुलत मामा घरी आला होता. महिलेची आई स्वयंपाकासाठी आत गेली होती. मात्र आईला शंका आल्याने तिने घरामध्ये पाहिले असता तेथे कोणीच दिसले नाही. आईने आतील खोलीमध्ये पाहिले तेव्हा आरोपी पीडितेचे लैंगिक शोषण करताना दिसला. महिलेच्या आईने जाब विचारताच तो पळून गेला. याबाबत एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुनावणी आणि शिक्षाखटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात पीडितेची आजी आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून पोक्सोच्या कलम ६ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड आणि भादंवि कलम ३७६ (२) अन्वये १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. जमादार शेख रज्जाक यांनी पैरवी म्हणून सहकार्य केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादCourtन्यायालय