शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

समांतर जलवाहिनीबाबत शासन सकारात्मक; मनपाने मानसिकता बदलावी : मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 16:47 IST

समांतर पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.

औरंगाबाद : समांतर पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी समांतर जलवाहिनीची संपूर्ण माहिती घेत या कामाची सुरुवात झाली पाहिजे अन्यथा पुढील दहा वर्षात शहराला पाणी मिळणार नाही असे म्हटले.  

आजच्या व्हिसीसाठी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार इम्तियाज जलील, संजय सिरसाट, अतुल सावे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समांतर जलवाहिनी संदर्भात सर्व बाबी जाणून घेतल्या. एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, जलवाहिनीच्या कामाबद्दल मनपाने सकारात्मक असावे, अन्यथा पुढच्या दहा वर्षात शहराला पाणी मिळणार नाही.

यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आता दुसऱ्या कोणत्या कंपनीकडून याचे काम करून घेणे उचित नाही. मनपाने या योजनेला गांभीर्याने घ्यावे, राज्य सरकार याबाबत सकारात्मक असून मनपाने आपली मानसिकता बदलावी. 

दरम्यान, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा ठराव मनपाने घेतल्यानंतर त्या कराराला नवसंजीवनी देण्याचा विचार पालिका सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. करार रद्द केल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी कंपनीने समांतर योजनेच्या कराराला नवसंजीवनी देण्याचा प्रस्ताव मनपाकडे सादर केला आहे. राज्य सरकारने समांतर योजनेची मूळ माहिती घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

अनुदान बँकेत पडून समांतरच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव मांडला आहे. परंतु गेल्या पाच सभेमध्ये या प्रस्तावावर चर्चा न होताच सभा तहकूब झाली. प्रशासनाच्या प्रस्तावामध्ये दरवाढ झाल्यामुळे कंपनीला द्यावे लागणारे फरकाचे ११५ कोटी रुपये, जीएसटीचे १७४ कोटी, असे २८९ कोटी रुपये राज्य सरकारकडून अनुदान स्वरुपात मिळावे,अशी मागणी आहे. मूळ समांतर योजना ७९२ कोटींची असून, केंद्र ,राज्याने दिलेले अनुदान बँकेत पडून आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादChief Ministerमुख्यमंत्री