शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे प्राध्यापकांची बाजू मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:01 IST

एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणात कुलगुरूंनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आदी ठिकाणी प्राध्यापकांची बाजू मांडावी, अशी आग्रही मागणी प्राचार्य, प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेताना विद्यार्थी किरकोळ कारणावरून धमक्या देतील. त्या धमक्यांना बळी पडून पोलीस गुन्हे दाखल करतील. तेव्हा परीक्षा कशा घेणार? असा सवाल करून एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणात कुलगुरूंनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आदी ठिकाणी प्राध्यापकांची बाजू मांडावी, अशी आग्रही मागणी प्राचार्य, प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात परीक्षेत कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थ्याने वर्ष वाया जाण्याच्या भीतीने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी राजकीय संघटनांच्या दबावाला बळी पडून संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि परीक्षेत पर्यवेक्षण करणाऱ्या प्राध्यापकांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासाठी प्राचार्य, बामुक्टो संघटनेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठातील उच्च पदस्थ अधिका-यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी महात्मा फुले सभागृहात झालेल्या बैठकीत प्राचार्यांतर्फे डॉ. मजहर फारुकी, डॉ. वैशाली प्रधान यांनी बाजू मांडली. तर बामुक्टो संघटनेकडून डॉ. बाप्पासाहेब म्हस्के, डॉ. विक्रम खिलारे आणि डॉ. उमाकांत राठोड यांनी प्राध्यापकांना परीक्षेत येणा-या अडचणी मांडल्या. यावर परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर आणि कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्राध्यापक, प्राचार्य यांच्या बाजूने विद्यापीठ प्रशासन बाजू मांडेल, अशी ग्वाही दिली.यांची उपस्थिती...शिष्टमंडळात मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली प्रधान, रफिक झकेरिया महिला महाविद्यालयाचे प्राचार्य मझहर फारुकी, जेएनईसीचे प्राचार्य हरिरंग शिंदे, मौलाना आझादचे प्राचार्य रजा उल्ला खान, स. भु. कला व वाणिज्यचे प्र्राचार्य जे. एस. खैरनार, आयसीसीएमचे प्राचार्य दिलीप गौर, श्रेयसचे प्राचार्य एस. बी. पवार, सीएसएमएसचे डॉ. उल्हास शिंदे, एमआयटीचे प्राचार्य नीलेश पाटील, प्राचार्य संतोष भोसले, प्राचार्य सुनील देशमुख, प्राचार्या मुक्ती जाधव, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद उबाळे आदी उपस्थित होते.परीक्षेच्या कामात अडथळा निर्माण करणा-या गैरप्रकारात प्राध्यापक, प्राचार्यांवर गुन्हे दाखल झाल्यास विद्यापीठ प्रशासन योग्य ती पावले उचलील. एमआयटी नर्सिंग महाविद्यालय हे नाशिकच्या आरोग्य विज्ञान महाविद्यालयाशी संलग्न आहे. यामुळे सर्व प्राचार्य, प्राध्यापकांनी त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना भेटावे, असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. याच वेळी विद्यापीठ प्रशासन पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त आणि गृहविभागाकडे दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात प्राध्यापकांची बाजू मांडेल, असेही कुलगुरू डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :universityविद्यापीठProfessorप्राध्यापकDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थी