शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

शासनाचे ३ कोटींचे नुकसान; निलंबित उपजिल्हाधिकारी खिरोळकरांना वसूलीची नोटीस बजावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 19:22 IST

१५ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी ८४ प्रकरणे हाताळली. त्यातील काही प्रकरणात शासनाचे नजराणा शुल्क कमी भरून घेतले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वर्ग २ मधील जमिनी वर्ग १ मध्ये करण्याचा सपाटा निलंबित निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी लावल्याचे चौकशीअंती उघडकीस आले. १५ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी ८४ प्रकरणे हाताळली. त्यातील काही प्रकरणात शासनाचे नजराणा शुल्क कमी भरून घेतले. यात शासनाचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला. तीन महिन्यानंतर चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. खिरोळकरांना भरपाईसाठी जिल्हा प्रशासन नोटीस बजावणार आहे. ८४ पैकी काही संचिकांमध्ये लहान-मोठ्या अनियमितता आढळून आल्या आहेत.

तीसगाव येथील वर्ग- २ ची जमीन वर्ग १ मध्ये बदलण्यासाठी तब्बल २३ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ मे रोजी तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी खिरोळकर आणि महसूल सहायक दीपक त्रिभुवन या दोघांना अटक केली होती. यानंतर खिरोळकर आणि त्रिभुवन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांनी पदावर असताना १५ महिन्यांत मंजूर केलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती.

नोटीस बजावण्यात येईलचौकशी समितीचा अहवाल मिळाला आहे. तीन प्रकरणांत जुन्या दरानुसार नजराणा घेतल्यामुळे शासनाचे नुकसान झाल्याचा ठपका आहे. त्यामुळे संबंधितांना नोटीस बजावण्यात येईल.- दिलीप चव्हाण, जिल्हाधिकारी

१५० संचिका पाईपलाईनमध्येअब्दीमंडीमध्ये उत्तमरीत्या संचिका हाताळणाऱ्या एका लिपिकाकडे १५० हून अधिक वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये बदल करण्यासाठी आलेल्या प्रस्तावाच्या संचिका आहेत. तो लिपिक सध्या ग्रामीण तहसीलमध्ये कार्यरत आहे. त्याची बदली दुसऱ्या विभागात असताना त्याला तेथे बसविले आहे. प्रत्येक संचिकेचा नजराणा मिळाल्यानंतरच तो लिपिक प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवित असल्याची चर्चा आहे. एका मंत्र्याने शिफारस करून त्या लिपिकाची बदली गृह शाखेत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुचविले होते. परंतु अब्दीमंडीतील उत्तम कामगिरीमुळे त्याची बदली रोखली गेली.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर