शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

'तुमच्या जीवाला धोका होईल, असे कुठलेही पाऊल सरकार उचलणार नाही'- संजय शिरसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 15:37 IST

'कुणीतरी आंदोलनाला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे.'

छत्रपती संभाजीनगर/जालना: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज(दि.25) अंतरवाली सराटीतील पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही लोकांना पुढे करुन मला संपवण्याचे कारस्थान होत आहे. फडणवीसांना माझा बळीच हवा असेल तर मी आज त्यांच्या सागर बंगल्यावर येतो, त्यांनी मला ठार मारा, असे आव्हान जरांगेंनी दिले आहे. यावर शिवसेना(शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलतना शिरसाट म्हणाले की, 'मला वाटते की, या आंदोलनाची दिशा बदलत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या सर्व बाजू स्पष्टपणे सांगितल्या आहेत. या सरकारने समाजाला 10 टक्के आरक्षणही दिले आहे. त्यांच्या पुढाकारानेच लाखो कुणबी समाजच्या नोंदी काढल्या गेल्या, साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना कामाला लावून सर्वे केला गेला. आता काही लोक आंदोलनाला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, आरक्षण टिकणार नाही असे सांगत आहेत.' 

'गेल्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागास कसा, याचे पुरावे द्या, असे सांगितले होते. त्यामुळेच या सरकारने सर्वे करुन त्या सर्व गोष्टी क्लिअर केल्या आहेत. आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे. काही लोक समाजाची माथी भडकवण्याचे काम करत आहे. मी जरांगेंना विनंती करतो की, तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोला. ज्यांच्यावर तुम्ही टीका करत आहात, त्यांच्याशी चर्चा करा, चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करा,' असंही शिरसाट म्हणाले. तसेच, 'जरांगेंनी आरोप केला की, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय. असे कुणालाही जीवे मारण काय पोरखेळ आहे का? अशाप्रकारची हूकूमशाही कुणीही करणार नाही. त्यामुळे त्यांनी निश्चिंत राहावे. जरांगेंच्या तब्येतीची काळजी घ्या, असे हायकोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे तिथले डॉक्टर सर्व गोष्टी चेक करुनच त्यांना ट्रीटमेंट देत आहे. एखादी साधी गोळीही देत असतील तर सर्व तपास केला जातो. तुमच्या जीवाला धोका होईल, असे पाऊल सरकार उचलणार नाही. कुठल्याही प्रकारचा गैरसमज मनात आणू नका,' असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSanjay Shirsatसंजय शिरसाटJalanaजालनाAurangabadऔरंगाबाद