शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
5
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
8
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
9
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
10
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
11
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
12
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
13
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
14
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
15
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
16
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
17
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
18
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
19
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
20
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...

भिकेचे नव्हे तर सरकारला हक्काचे पाणी द्यावेच लागेल; पाणी प्रश्नांवर मराठवाड्यातील आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 16:51 IST

सरकारला जायकवाडीला हक्काचे पाणी द्यावेच लागेल अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील आमदार औरंगाबादेत एकत्र आले. 

औरंगाबाद : पाणी प्रश्नावर मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही, सरकारला जायकवाडीला हक्काचे पाणी द्यावेच लागेल अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील आमदार औरंगाबादेत एकत्र आले. 

हक्काच्या पाण्यासंदर्भात शहरात मराठवाड्यातील आमदारांच्या एका बैठकीचे आज आयोजन करण्यात आले. यास १४ आमदारांची उपस्थिती होती. यावेळी आमदारांनी आक्रमक भूमिका घेत जायकवाडीत भिकेचे पाणी नको तर हक्काचे पाणी हवे आणि ते सरकारला द्यावेच लागेल अशी भूमिका घेतली.तसेच समन्यायी पाणी वाटपची तातडीने अंमलबजावणी करावी आणि मराठवाड्यातील अर्धवट सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी आमदारांनी केली. 

मराठवाडा राजकीय नेतृत्वाबाबत कमनशिबी मराठवाड्याच्या हक्काच्या लढाईचे रणशिंग फुंकण्यासाठी फक्त १४ आमदारांनी हजेरी लावली. राजकीय नेतृत्वाबात मराठवाडा नेहमीच कमनशिबी ठरलाय. पाण्याची लढाई मोठ रुप घेणार असे चित्र निर्माण होणार आहे.

जायकवाडीत अवघा ३३% जलसाठायंदा पावसाने दगा दिल्यामुळे जायकवाडी धरणात अवघा ३३.७२ टक्के साठा राहिला आहे. गतवर्षी जायकवाडी शंभर टक्के भरले होते. परंतु गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ६६.२८ टक्क्यांनी कमी साठा आहे. परिणामी आगामी काळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत.मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून १७२ दलघमी म्हणजे ७ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय आठवडा उलटूनही घेण्यात आलेला नाही. या जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरील धरणांतील पाणी जायकवाडीत सोडण्यास विलंब होत आहे. त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदार एकत्र आले आहेत. 

मुंबईत अधिकाऱ्यांची बैठकजायकवाडीत वरील धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात मुंबईत आज बैठक होत आहे. या बैठकीस महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांच्यासह नगर, नाशिकचे अभियंते उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकारNashikनाशिकAhmednagarअहमदनगर