शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने नोकरी द्यावी, नाहीतर चालते व्हावे : कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 17:09 IST

सरकारने या बेरोजगारांना नोकरी द्यावी, नाहीतर चालते झाले पाहिजे, असा इशारा आ. कपिल पाटील यांनी येथे दिला.

औरंगाबाद : राज्यातील सरकार खाजगीकरण, कंत्राटीकरण आणि आऊटसोर्सिंगच्या बाजूने आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा तात्काळ भरल्या पाहिजे. त्यासाठी पात्रताधारक बेरोजगारांची मोट बांधून राज्यभर आंदोलन उभे करावे लागेल. सरकारने या बेरोजगारांना नोकरी द्यावी, नाहीतर चालते झाले पाहिजे, असा इशारा आ. कपिल पाटील यांनी येथे दिला.

डी.टी.एड., बी. एड. स्टुडंट असोसिएशनची शिक्षक भरतीसंदर्भात रविवारी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आ. पाटील बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष प्राजक्ता गोडसे, परमेश्वर इंगोले, सरचिटणीस प्रा. राम जाधव, प्रशांत शिंदे, प्रा. विजय भणगे, प्रा. नामदेव शिंदे, जमीर शेख आदींची उपस्थिती होती. 

यावेळी आ. पाटील म्हणाले, शिक्षक भरतीसाठी पात्रताधारकांची रेंगाळेली भरती प्रक्रिया हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. जो जास्त पैसे देतो, त्याला नोकरी आणि ज्याला काही येत नाही, तो नोकरीत येतो, अशी वाईट अवस्था आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी असे तीनही विषय एकाच शिक्षकाला शिकविण्याची वेळ येत आहे. रिक्त असलेल्या जागा तात्काळ भरल्या पाहिजे. त्यासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागेल, असे आ. पाटील म्हणाले. संतोष मगर म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून पात्र असूनही नोकरीसाठी लढत आहे. नेमकी भरती केव्हा होणार, हे अजूनही स्पष्ट होत नाही.

नोकरभरतीचा हा गोंधळ गिनीज बुकमध्ये नोंदविला पाहिजे. शिक्षक भरतीसंदर्भात विधिमंडळात आवाज बुलंद झाला पाहिजे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक करताना प्रा. प्रशांत शिंदे म्हणाले, शिक्षक भरतीसंदर्भात शिक्षणसंस्था न्यायालयात गेल्या आहेत. संस्थांसंदर्भात न्यायालय निर्णय घेईल. तोपर्यंत जि.प.सह स्थानिक संस्थांतील भरती झाली पाहिजे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असे ते म्हणाले.

३० टक्के कपातच्शिक्षण विभागात मागच्या दाराने ३० टक्के नोकरी कपात लावली जात आहे. शिक्षक भरतीबरोबर या कपातीला, खाजगीकरण, आऊटसोर्सिंग, कंत्राटीकरणालाही विरोध केला पाहिजे. तरुणांनी खाजगी क्षेत्रातील नोकऱ्याही मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही आ. कपिल पाटील म्हणाले.

२०१९ मध्ये सरकारला घालवावे लागेलच्फोडा आणि झोडा ही संस्कृती प्रमाण मानणारे आज सत्तेवर आहेत. परंतु बेरोजगारांनी आपापसात भांडता कामा नये. आधीचे सरकार किमान ऐकून घेत असे, असे म्हणत राज्य सरकार आणि शिक्षणमंत्र्यांवर आ. पाटील यांनी टीका केली. २०१९ मध्ये या सरकारला घालवावे लागेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रState Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारीStudentविद्यार्थी