शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

बांधकाम विभागातील टेंडरची माहिती देतात सरकारी पंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 20:36 IST

ई-टेंडरिंग यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात 

ठळक मुद्देमारहाणीशी माझा संबंध नाही- आ. शिरसाट

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागात बड्या कामांसाठी कुणाकुणाच्या निविदा (टेंडर) आल्या आहेत याची माहिती विभागातील आॅनलाईन निविदा कक्षात काम करणारे सरकारी ‘पंटर’च लोकप्रतिनिधींना पुरवितात. त्यामुळे मर्जीतील गुत्तेदाराला काम मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधी उर्वरित कंत्राटदारांवर दबाव टाकतात. त्या दबावतंत्रातूनच शिवसेनेचे आ. संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि विधानसभा संघटक सुशील खेडकर यांच्यात राडा झाला. बांधकाम विभागातील आॅनलाईन ई-टेंडरिंग सिस्टीम यानिमित्ताने संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

सूत्रांनी सांगितले की, सप्टेंबर २०१९ मध्ये सातारा-देवळाईत अडीच व सव्वादोन कोटींची दोन कामे बांधकाम विभागाने काढली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यामुळे ६ डिसेंबर रोजी निविदा उघडण्यात आल्या. त्यात अधीक्षक अभियंता सुरेश देशपांडे यांना न कळविता निविदा उघडण्यात आल्या. आर.टी. कन्स्ट्रक्शन्स, आर.एस. पवार, सहारा कन्स्ट्रक्शन्स यांना अपात्र ठरवून आेंकार कन्स्ट्रक्शन्सला वर्कआॅर्डर देण्यात आली. परस्पर हा प्रकार घडल्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनी वर्कआॅर्डर रद्द केली. या प्रकरणातून आ. शिरसाट यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे संताप व्यक्त केला. उर्वरित तीन जणांकडून निविदांवरील हक्क सोडल्याबाबत स्वाक्षरीची अट अभियंत्यांनी टाकली. त्यात दोन कंत्राटारांनी स्वाक्षरी केली. मात्र, खेडकर यांनी स्वाक्षरी केली नाही. दरम्यान, देशपांडे यांनी त्या कामासाठी नव्याने निविदा मागविल्या. २७ डिसेंबर २०१९ रोजी खेडकर यांनी आर.टी. कन्स्ट्रक्शन्समार्फत नव्याने निविदा दाखल केल्या. खेडकर यांच्या निविदेची  माहिती ई-टेंडरिंगमधील आ. शिरसाट यांना मिळालई, त्यानंतर निविदा मागे घेण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. 

अधीक्षक अभियंता म्हणाले...बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुरेश देशपांडे म्हणाले, निविदा रद्द करण्यात आलेली नाही. निविदा क्र.१ तपासणीसाठी पाठविलेली आहे. ज्याची निविदा नियमात बसते, त्यांना काम जाईल. विभागातील ई-टेंडरिंगची माहिती बाहेर कशी काय जाते, यावर ते म्हणाले, याबाबत माहिती तर घ्यावीच लागेल. ज्यांच्यावर संशय येईल, त्यांची बदली करण्यात येईल. 

मारहाणीशी माझा संबंध नाही- आ. शिरसाटशिवसेना आ. संजय शिरसाट यांनी एका निवेदनाद्वारे दावा केला आहे की, सदरील मारहाणीशी माझा काहीही संबंध नाही. निवडणुकीदरम्यान सातारा-देवळाईतील नागरिकांना १० कोटींतून अंतर्गत रस्त्यांचे काम करण्याचे आश्वासन दिले होते. आचारसंहितेमुळे निवडणुकीनंतर वर्कआॅर्डर देण्यात आली; परंतु काही लोकांनी ते काम रद्द करण्यासाठी बांधकाम विभागाला पत्र दिल्याने वर्कआॅर्डर रद्द करण्यात आली. त्या कामाची पुन्हा फेरनिविदा काढण्यात आली. काही जणांनी पुन्हा निविदा रद्द करण्याचे प्रयत्न सुरू केले. हा सगळा प्रकार माझी प्रतिमा मलिन करणारा आहे. मी कंत्राटदार नाही, तसेच कुणाचीही शिफारस करीत नाही, असा दावा आ. शिरसाट यांनी केला, तसेच चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSanjay Shirsatसंजय शिरसाटfundsनिधी