शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयांत मराठीचा वापर कमीच; भाषा संचालनालयाच्या तपासणी दौर्‍यातून आले समोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 15:46 IST

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नसल्याचे चित्र आहे. भाषा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामांमध्ये मराठीचा ८० ते ८५ टक्के वापर केला जातो. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही शासनाला १०० टक्के मराठी धोरण राबविण्यात अपयश आले असेच म्हणावे लागेल.

ठळक मुद्देमराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नसल्याचे चित्र आहे.भाषा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामांमध्ये मराठीचा ८० ते ८५ टक्के वापर केला जातो.

औरंगाबाद : मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नसल्याचे चित्र आहे. भाषा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामांमध्ये मराठीचा ८० ते ८५ टक्के वापर केला जातो. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही शासनाला १०० टक्के मराठी धोरण राबविण्यात अपयश आले असेच म्हणावे लागेल.

शासनाच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर होतो आहे किंवा नाही हे प्रत्यक्ष तपासणी करून त्याचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करण्याचे काम भाषा संचालनालयाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद येथील विभागीय भाषा संचालनालयातर्फे नुकतेच अहमदपूर येथील पंचायत समिती व उदगीर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची तपासणी करण्यात आली. साधारणत: सरकारी कार्यालयांमध्ये नाम किंवा पदनाम फलक, सूचना व निर्देश फलक, कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या, इंग्रजी उच्चारानुसार नामोल्लेख, रोख पुस्तिकेतील गोषवारे, अधिकार्‍यांचे शेरे, शिक्के, पत्रव्यवहार इंग्रजी भाषेतूनच करण्यात येतो, अशी माहिती संचालनालयाकडून मिळाली. यामध्ये न्यायालयासंबंधी प्रकरणांतील दस्तावेज यासारखे वर्जित प्रयोजने वगळण्यात येतात.

शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या कार्यालयांमध्ये मराठीचा शंभर टक्के वापर होत असल्याची खात्री करून घेण्यासाठी विभागीय कार्यालयाकडून संपूर्ण मराठवाड्यात कार्यालयीन तपासण्या केल्या जातात. तपासणीच्या वेळी मराठीकरणाच्या संदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन त्या- त्या कार्यालयांना करण्यात येते, अशी माहिती विभागीय सहायक भाषा संचालक चंद्रकांत पारकर यांनी दिली.वर्जित प्रयोजने वगळता इतर बाबतीत योग्य कारण नसताना मराठीचा वापर करण्यासंदर्भात जे अधिकारी किंवा कर्मचारी वारंवार समज देऊनही टाळाटाळ करतात त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा अधिकार सर्व विभागप्रमुखांना असतो. राजभाषा ही जनतेची भाषा असते. लोकशाहीच्या विकासासाठी लोकभाषेचा अवलंब करणे ही आजची गरज आहे, अशी भाषा संचालनालयाची भूमिका आहे.

मराठी ही आपुलकीचा भागमराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी कार्यालयांना विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. शासन केवळ नियम तयार करू शकते. परंतु शेवटी अंमलबजावणीच्या पातळीवर हे व्हावे.  - चंद्रकांत पारकर, विभागीय सहायक भाषा संचालक

टॅग्स :marathiमराठीAurangabadऔरंगाबाद