शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामाच्या नुकसान भरपाईपोटी मराठवाड्याच्या झोळीत शासनाकडून १७९१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 12:09 IST

अवकाळीच्या नुकसानीनंतर मदतीचा दुसरा हप्ता 

ठळक मुद्दे ३३५० कोटींपैकी आजवर २६८२ कोटी विभागाला अनुदान प्राप्त झाले आहे.  मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील सुमारे ४४ लाख ३३ हजार ५४९ शेतकऱ्यांचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यात अवकाळी पावसाने खरीप हंगाम हिरावून नेला. त्या नुकसानीपोटी शासनाने विभागाला ८१९ कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्याची तरतूद केल्यानंतर १३ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील १७९१ कोटी रुपयांचे अनुदान विभागाला देऊ केले आहे.१३ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाने शासनाला २९०४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारा अहवाल दिला होता. त्यात पुन्हा ४५० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली. ३३५० कोटींपैकी आजवर २६८२ कोटी विभागाला अनुदान प्राप्त झाले आहे. 

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दोन हजार ५९ कोटी ३६ लाख रुपयांची मदत जाहीर झाली होती. या मदतीच्या रकमेतून बँकेने कोणतीही इतर वसुली न करण्याचे आदेश आहेत. प्रत्येकी दोन हेक्टरपर्यंत मदत करण्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. दोन-चार दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्यातील मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये समुद्रातील चक्रीवादळामुळे राज्याला अवकाळी पावसाने झोडपले. ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांमधील शेती पिकाचे नुकसान झाले. यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील सुमारे ४४ लाख ३३ हजार ५४९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासकीय स्तरावर निर्णय झाला. त्यानंतर मदतीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे शासनादेश निघाले आहेत. 

मराठवाड्याला ३३५० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव विभागीय प्रशासनाने शासनाकडे पाठविला. राज्यपालांनी शेती पिकांना प्रतिहेक्टर आठ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांना (फळबागा) हेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. टप्प्याटप्प्यानुसार विभागनिहाय आणि जिल्हानिहाय मदत वाटपास सुरुवात होईल. अंतिम पंचनाम्याच्या अहवालानुसार मराठवाड्यातील ४० लाख ४७ हजार २१० हेक्टर कोरडवाहू, ६९ हजार ४११ हेक्टरवरील बागायती, तर ३२ हजार ५५२ हेक्टरवरील फळबाग क्षेत्राचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रfundsनिधीagricultureशेतीFarmerशेतकरी