शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे कामकाज काही जिल्ह्यांपुरतेच मर्यादित; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका 

By सुमेध उघडे | Updated: November 23, 2020 14:26 IST

उर्वरित महाराष्ट्राकडे सरकारचे साफ दुर्लक्ष

ठळक मुद्देसरकारमध्ये समन्वय नाहीय, ज्याला जे वाटेल ते बोलले जातकाही लोक कुठेच शांत राहत नाहीत

औरंगाबाद : राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, ज्याला जे वाटेल ते बोलले जात आहे. विविध मंत्र्यांनी दिलेले प्रस्ताव फेटाळले जातात. सरकारचे कामकाज केवळ काही जिल्ह्यांपुरतीच मर्यादित असून उर्वरित महाराष्ट्राकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

पदवीधर मतदार संघाच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. पत्रकारांची संवाद साधताना फडणवीस पुढे म्हणाले, राज्य सरकार केवळ काही जिल्ह्यांसाठी काम करत आहे. आमच्या सरकारच्या काळात मराठवाड्याला प्राथमिकता देण्यात आली. औरंगाबादच्या पाणी पुरवठा योजनेस निधी दिला. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मंजूर केली. मात्र, या सरकारने वॉटर ग्रीड योजना स्थगित केली. जनता रस्त्यावर उतरेल म्हणून ही योजना रद्द न करता स्थगिती दिली. सरकारने विदर्भ आणि मराठवाड्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. सरकार राज्यातील काही जिल्ह्यांपुरतेच काम करीत असून विदर्भ, मराठवाड्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे,  असा आरोपही त्यांनी यावेळी केला.  

काही लोक कुठेच शांत राहत नाहीतपदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून नाराज जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप सोडली याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, काही लॉक कुठेच शांत बसत नाही.मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांच्याबद्दल नाराजी आहे. भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

सरकार मध्ये समन्वय नाहीसरकारमध्ये समन्वय नाही, ज्याला जे वाटेल ते बोले जाते. मंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावावर विचार न करता ते फेटाळले जातात, अशी टीकाही फडणवीस यांनी वीज बिल माफीच्या प्रस्तावावर निर्णय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केली. कोरोनासाठी उभारलेली यंत्रणा पूर्ण सक्षमतेने कार्यान्वित ठेवावी,  लवकर लस येईल अशी आशा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

आता दिवसा शपथविधी होणार एक वर्षांपूर्वीच्या पहाटेच्या शपथविधी बद्दल देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनी, आता शपथविधी पहाटे पहायला मिळणार नाही, जाहीर करू असे म्हटले. तसेच असल्या गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारBJPभाजपा