शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर.. पुन्हा गाठता येणार दीड तासात बंगळुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 18:16 IST

१५ एप्रिलपासून विमानसेवेच्या हालचाली

औरंगाबाद : औरंगाबादहून पुन्हा एकदा दीड तासात बंगळुरू गाठता येणार आहे. इंडिगोची सकाळच्या वेळेत ही विमानसेवा १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा सुरू होण्याच्या हालचाली असल्याची माहिती विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली.

कोरोनापूर्वी स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांकडून बंगळुरूसाठी विमानसेवा दिली जात होती, परंतु कोरोनाचा फटका बसला आणि बंगळुरूची हवाई कनेक्टिव्हिटी तुटली. आयटी हब म्हणून बंगळुरूची ओळख आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षणासाठी औरंगाबादहून बंगळुरूला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

नोव्हेंबर, २०१९ मध्ये पहिल्यांदा बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू झाली होती. त्यास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे त्यात खंड पडला. आता प्रवाशांचीही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

बहुतांश प्रवासी बंगळुरू विमानसेवेसाठी शिर्डी विमानतळ गाठतात. औरंगाबादहून ही सेवा पुन्हा नव्याने विमानसेवा सुरू झाल्यास शिर्डीला जाण्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार नाही. ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात दुजोरा दिला नाही.

स्पाइस जेट, जेट एअरवेजची प्रतीक्षास्पाइस जेट, जेट एअरवेजकडून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू केली जाईल, असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात येत होते, परंतु या दोन्ही कंपन्यांच्या विमानसेवेची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

सकाळच्या वेळेत विमानसेवा गरजेचीऔरंगाबादहून सकाळच्या वेळेत विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे इतर विमानतळांवर पोहोचल्यानंतर इतर कनेक्टिंग फ्लाइटने प्रवास करणे सोपे होते, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जसवंतसिंग म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटन