शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

अबब! सोने ७० हजाराच्या घरात, आजपर्यंतचा सर्वाधिक भाव

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 29, 2024 19:00 IST

भाव वाढत असल्याने ज्वेलर्सच्या दुकानात अगदी तुरळक गर्दी दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : दहा ग्रॅम सोने खरेदीसाठी गुरुवारी तब्बल ६७ हजार ५०० रुपये मोजावे लागले यावर ३ टक्के जीएसटी धरल्यास ६९ हजार ५२५ रुपये म्हणजे ७० हजाराच्या घरात सोने जाऊन पोहोचले. यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांचे यामुळे डोळे पांढरे पडले. कारण, सोन्याला आजपर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला. भाव वाढत असल्याने ज्वेलर्सच्या दुकानात अगदी तुरळक गर्दी दिसून येत आहे. ज्यांच्याकडे लग्नकार्य आहे तेच ग्राहक सोने खरेदी करताना बघण्यास मिळाले.

८८ दिवसांत वाढले ४ हजारांने भाव१ जानेवारी २०२४ ला सोन्याचे भाव ६३ हजार ३५०रुपये प्रति १० ग्रॅम होते. मात्र, त्यानंतर सतत भाव वाढत गेले. फेब्रुवारीत ६३ हजार ५०० रुपयांनी सोने विक्री झाले. दोन दिवसांपूर्वी सोन्याचे भाव ६७००० रुपये होते आज ६७ हजार ५०० रुपयांपर्यंत सोने जाऊन पोहोचले आहे. हे शुद्ध सोन्याचे भाव आहेत. नवीन वर्षातील पहिल्या ८८ दिवसात ४१५० रुपयांनी सोने महागले आहे.

सोने महागण्यात चीन देशाचा हातजगात सध्या सर्वाधिक सोने खरेदी चीन देश करत आहे. जगातील सोन्याचा सर्वांत मोठा साठा आपल्याकडे असावा या उद्देशाने चीन मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करीत आहे. गोलमाल असलेली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी चीन हे पाऊल उचलत आहे. त्यामुळे जगभरातील विकसित देश सोने खरेदी करू लागले. खरेदीत स्पर्धा वाढल्याने सोने महाग होत आहे.-गिरधर जालनावाला, ज्वेलर्स

जीएसटीसह सोने ७० हजारगुरुवारी सोने ६७ हजार ५०० रुपये प्रति १० ग्रॅम विक्री झाले. त्यावर जीएसटी ३ टक्के म्हणजे २०२५ रुपये लागते. जीएसटीसह सोने ६९ हजार ५२५ रुपयांना विकत आहे.-जुगलकिशोर वर्मा, ज्वेलर्स

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGoldसोनं