शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मातीतून निघालेले सोने मातीतच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 13:54 IST

जुई नदीकाठावरील शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

ठळक मुद्देअतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका 

- रघुनाथ सावळे

उंडणगाव (जि. औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात तळहाताच्या फोडांप्रमाणे जगविलेली पिके अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत नदीच्या पुरात वाहून गेली. मातीतून निघालेले सोने मातीतच मिसळल्याने येथील बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, सध्या परिसरात प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू असले तरी आर्थिक मदत मिळणार कधी, याकडे हजारो शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

जवळपास २० दिवसांपासून परिसरात कधी रिमझिम तर कधी जोरदार वृष्टी झाल्याने येथील मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, ज्वारी आदी पिके हातातून गेली. सध्या येथील बहुतांश शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून, विशेषत: येथील जुई नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा अधिक फटका बसला आहे. नदीने रौद्ररूप धारण करून काठावरील मका, सोयाबीन, भाजीपाला ही सर्वच्या सर्व पिके आपल्या कवेत घेतल्याने बळीराजा अक्षरश: रस्त्यावर आला आहे.

उंडणगावसह खुल्लोड, विरगाव, वसई, जळकी, खंडाळा, मोहाळ आदी गावांत शेतकऱ्यांनी काढणी केलेले मक्याचे पीक अक्षरश: कुजले असून, कपाशीच्या कैऱ्यांना झाडावरच कोंब फुटले. तसेच सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मिरची, अद्रक आदी पिकांचे मातेरे झाले.  शेतांमध्ये पाणी साचलेले असल्याने येणाऱ्या रबी हंगामात पीक कसे येणार, या चिंतेत शेतकरी सापडला आहे.

गतवर्षी ११० क्विंटल पीक, यावर्षी मात्र हाती भोपळा उंडणगाव येथील महिला शेतकरी तान्हाबाई विठ्ठल नरवडे म्हणाल्या, गतवर्षी आम्ही मक्याचे ११० क्विंटल पीक घेतले होते. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने पूर्ण मका उद्ध्वस्त झाल्याने एक किलोभराही पीक शिल्लक राहिले नाही. याबाबत मक्यावर केलेला खर्चही निघणार नसल्याने पतीने या पिकासाठी घेतलेले कर्ज, उसनवारी कशी फेडणार याची सध्या चिंता आहे. 

नुकसानीचे आकडे मोठे परिसरातील जवळपास १०० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानीचे आकडे हे खूपच मोठे आहेत. त्याचे गणित लावणे अशक्यच आहे. एकीकडे बळीराजा संकटात असताना महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचामुळे नुकसानभरपाई मिळेल किंवा नाही, याबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबादRainपाऊस