शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
5
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
6
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
7
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
8
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
9
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
10
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
11
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
12
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
13
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
14
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
15
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
16
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
17
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
18
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
19
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
20
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

सोने खरेदी करणारे फायद्यात; वर्षभरात पाच हजारांनी वाढले भाव!

By प्रशांत तेलवाडकर | Published: January 06, 2024 2:09 PM

भाव वाढले की, विक्रीवर आठ दिवस परिणाम होतोच

छत्रपती संभाजीनगर : सोने-चांदी हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. होय, लग्नसराईत तर सोन्याच्या दागिन्यांत कोट्यवधींची विक्री होतेच; शिवाय साडेतीन मुहूर्त तसेच पाच वेळीस येणारा गुरुपुष्यामृत योग या शुभमुहूर्तावर सोने खरेदी केले जाते. यामुळे सोने व चांदीच्या भावात होणारी तेजी-मंदीकडे सर्वांचे लक्ष असते. मागील २०२३ च्या वर्षभरात सोने ५,१७६ रुपये (१० ग्रॅम) व चांदी किलोमागे ५,८२९ रुपयांनी तेजाळली. यामुळे खरेदी करणारे फायद्यात राहिले.

सोने-चांदीचे दरमहिना--------- सोने (प्रति तोळा)------ चांदी (प्रति किलो)जानेवारी २०२३ ५८,१२४ रु. ६८,६७१ रु.फेब्रुवारी            ५५,५५० रु. ६३,००० रु.मार्च             ५९,५१२ रु. ७१,५८२ रु.एप्रिल             ६२,००० रु. ७३,८६८ रु.मे             ६०,३९० रु. ७०,९८८ रु.जून             ५८,०५५ रु. ६८,४२९ रु.जुलै             ५९,५६७ रु. ७३,८६० रु.ऑगस्ट ५९,४८५ रु. ७४,६४५ रु.सप्टेंबर ५७,७१० रु. ७१,५६० रु.ऑक्टोबर ६१,२३८ रु. ७१,९३१ रु.नोव्हेंबर ६२,६०७ रु. ७५,९३४ रु.डिसेंबर ६३,२४६ रु. ७३,३९५ रु.४ जानेवारी (२०२३) ६३,३०० रु. ७४,५०० रु.

सोने ५,००० हजारांनी वाढलेमागील वर्षाच्या सुरुवातीला ५८,१२४ रुपये प्रति तोळा सोन्याचा भाव होता. त्यानंतर सोन्याचे भाव वाढतच गेले. दिवाळीत (नोव्हेंबर) ६२,६०७ रुपये दर होते. डिसेंबर महिन्यात ६३,२४६ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. शुक्रवारी ६३,७०० रुपयांना सोने मिळत होते. तोळ्यामागे ५,१७६ रुपयांनी सोने महागले. (यात तीन टक्के जीएसटीचा समावेश नाही) मागील वर्ष खरेदीदारांसाठी नफा कमविणारे राहिले.

चांदी ५,८०० हजारांनी वाढलीसोन्याप्रमाणे चांदीचे भावही तेजीत राहिले. मागील वर्षाच्या सुरुवातीला ६८,६७१ रुपये प्रति किलो चांदी विकली गेली होती. दिवाळीत नोव्हेंबरमध्ये ७५,९३४ रुपयांपर्यंत उच्चांकावर जाऊन पोहोचली. शुक्रवारी ७४,५०० रुपयांना चांदी विकली जात होती. (यात तीन टक्के जीएसटीचा समावेश नाही.)

भाव वाढले की, विक्रीवर आठ दिवस परिणाम होतोचमागील वर्ष भर सोने-चांदीचे भाव वाढतच राहिले. भाववाढ झाले की, त्याचा आठ दिवस परिणाम सराफा बाजारपेठेवर होत असतो. नंतर पूर्ववत परिस्थिती होते. मात्र, कितीही भाववाढ होत राहिली तर साडेतीन मुहूर्त व गुरुपुष्यामृत व लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली नाही.-आर.के. जालनावाला, ज्वेलर्स

 

टॅग्स :GoldसोनंAurangabadऔरंगाबाद