शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘बंडखोर आमदारांच्या गटात जाणे म्हणजे आत्महत्या’; महापालिकेत उद्धव सेनेचेच वर्चस्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 19:51 IST

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर औरंगाबाद महापालिकेतील ९० टक्के माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांचा एक गट शिवसेनेतून बाहेर पडला. यामध्ये औरंगाबाद शहरातील दोन आमदारांचा समावेश असला तरी आगामी काळात औरंगाबाद महापालिकेच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही. बंडखोर आमदारांच्या गटात सहभागी होण्यास कार्यकर्ते, स्थानिक नेते अजिबात तयार नाहीत. त्यांच्या गटात सहभागी होणे म्हणजे ‘राजकीय आत्महत्या ठरेल’, असे खासगीत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

२०१५च्या मनपा निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या २८ होती. सेना समर्थक पाच अपक्षांनी पाठिंबा दिल्याने ३३ नगरसेवकांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर औरंगाबाद महापालिकेतील ९० टक्के माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ५ ते ६ माजी नगरसेवक शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एप्रिल २०२० मध्ये मनपाची मुदत संपली. अडीच वर्षांपासून निवडणुका झाल्या नाहीत. महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार शिंदे गटाकडे जाण्यास तूर्त तरी तयार नाहीत. भविष्यात शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले तर शिवसेनेतील बहुतांश नगरसेवक कार्यकर्ते तिकडे जाण्याची शक्यता आहे. सध्या स्थानिक बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ यांच्यासोबत जाणे म्हणजे राजकीय आत्महत्या ठरेल, अशी भीती सर्वांना वाटत आहे. गुरुवारी शिरसाठ यांच्या कुटुंबीयांनी शिंदे यांच्या शपथविधीनंतर जल्लोष केला. या जल्लोषाला मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. जैस्वाल समर्थकांनी तर जल्लोषही केला नाही.

खैरे, दानवे यांची मजबूत पकडमहापालिकेत कधीकाळी आ. प्रदीप जैस्वाल यांचेच वर्चस्व होते. ते ठरवतील त्याच नगरसेवकाला मानाचे पद, अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळत होती. अलीकडे जैस्वाल यांची मनपावरील पकड बरीच सैल झाली. दोनदा नगरसेवक राहिलेले संजय शिरसाठ यांनी नंतर मनपाच्या कारभारात फारसा हस्तक्षेप केला नाही. आपल्या मोजक्या समर्थकांना नगरसेवकासाठी तिकीट मिळवून देणे, निवडून आणणे एवढेच काम त्यांनी केले. आता हे दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांच्या सेनेत नाहीत. त्यामुळे सेनेतील बहुतांश नगरसेवक चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्या तंबूत दिसत आहेत. दोन्ही नेत्यांची मनपावर चांगली पकड आहे.

पालकमंत्र्यानंतर दानवेचएप्रिल २०२० पासून महापालिकेत कारभारी नाहीत. तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन धोरणात्मक निर्णय घेत होते. स्थानिक पातळीवर छोटे-छोटे प्रश्न अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सोडविण्यात येत होते. पुढील पाच- सहा महिन्यानंतर निवडणुका झाल्यास मनपावर खैरे, अंबादास गटाचेच वर्चस्व दिसून येईल. कारण, इच्छुक उमेदवार सध्या या दोन्ही नेत्यांच्या मागे-पुढे दिसून येत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका