शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

देवा, आईला परत आणून दे रे, प्लीज! महिलेच्या दोन चिमुकल्यांचा घाटी रुग्णालयात टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:15 IST

पोलिसांसह उपस्थितांनाही अश्रू अनावर, उद्यानात मुलांसोबत खेळलेल्या आईचा घाटीत मृतदेह पाहून दोन्ही बहिणींचा विश्वासच बसेना

छ़त्रपती संभाजीनगर : देवा, माझ्या आईला परत आणून दे रे प्लीज, आम्हाला तिच्याशिवाय कोणी नाही, असे म्हणत सिद्धार्थ उद्यानात डोम कोसळून मृत पावलेल्या स्वाती अमोल खैरनार (वय ३७, रा. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज) यांच्या दोन्ही मुलांनी घाटी रुग्णालयात टाहो फोडला. हात जोडून ती मुले आईला परत देण्यासाठी देवाला विनवण्या करत होती. त्यांची मावशी, आजी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, ‘आमची आई वाचली असती, डॉक्टरांनी तिला इंजेक्शन का दिले नाही?’ असा बालआक्रोश ते करत होते. चिमुकल्यांचा आईसाठीचा टाहो पाहून पोलिसांसह सर्वच उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

बुधवारी शहरात सुटलेल्या सोसाट्याच्या वादळवाऱ्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला. मोठ्या आकाराचे बॅनरही फाटले. सिद्धार्थ उद्यानातही गर्दी होती; पण काळे ढग दाटून आल्याने मुसळधार पावसाची शक्यता पाहून अनेकांनी बाहेर पडायला सुरुवात केली. उद्यानात प्रवेश करणाऱ्यांसाेबतच बाहेर पडणाऱ्यांची एकाच वेळी गर्दी झाली. सायंकाळी सहा वाजता वादळामुळे उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील डोमचा सजावटीचा भाग पत्त्यासारखा कोसळून खाली पडला. काय घडतेय, हे कळायच्या आतच सिमेंटचा मोठा भाग पडला. यात प्रवेशद्वारासमोरच कुटुंबासोबत बाहेर पडलेल्या नागरिक, लहान मुलांच्या अंगावर भिंतीचा भाग पडला. त्यातच सिमेंटचा जड भाग थेट डोक्यात कोसळल्याने स्वाती अमोल खैरनार (वय ३७, रा. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज) व रेखा हरिभाऊ गायकवाड (वय ६५, रा. गजानननगर, हडको) यांचा जागीच अंत झाला.

जन्मापासून वडिलांची साथ मिळाली नाही, आता आई पण बालपणीच सोडून गेलीमूळ नाशिक जिल्ह्यातील असलेल्या स्वाती अमोल खैरनार (३७) या पतीपासून विभक्त होत्या. त्या १० वर्षांपासून रांजणगाव शेणपुंजीमध्ये राहणाऱ्या भावाकडे राहत. त्यांचा एक भाऊ लष्करात जम्मू- काश्मीर येथे आहे तर दुसऱ्या भावाचे हॉटेल आहे. लष्करातील भाऊ सुटीनिमित्त घरी आला होता. शहरातच राहणारी धाकटी बहीण त्यामुळे त्यांच्या घरी गेली होती. सर्वांनी उद्यानात जाण्याचे ठरवले. दुपारी ३ वाजता स्वाती, आई, लहान बहीण, वहिनी व चार मुलांसह उद्यानात गेल्या. ६ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडताना मात्र स्वाती डोमच्या खाली सापडल्या आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. दोन चिमुकल्यांसमोर त्यांची आई कायमची गेली.

दोन वर्षांचा चिमुकला क्षणात वाचलाउद्यानातून बाहेर पडताना स्वाती यांच्या कडेवर त्यांच्या भावाचा दोन वर्षांचा मुलगा होता. प्रवेशद्वारावर सोसाट्याचा वारा सुटल्याने त्यांनी त्याला त्याच्या आईकडे दिले. पुढे काही पावले टाकताच डोम कोसळला आणि क्षणाच्या फरकाने चिमुकला वाचला.

सोबत खेळलेली आजी घरी परतलीच नाहीरेखा गायकवाड कुटुुंबासह हडकोत राहत. त्यांचे पती विद्यापीठातून निवृत्त झाले आहेत. मुलगा व्यावसायिक असून विवाहित मोठी वकील मुलगी पुण्याला तर धाकटी मुलगी हर्सूलमधील छत्रपती हॉलजवळ राहते. पुण्याची मुलगी दहा दिवसांपूर्वी मुलांसह शहरात आली होती. त्यामुळे धाकटीही मुलांसह आईकडे आली. पुण्याच्या नातवंडांना सिद्धार्थ उद्यानातील प्राणी पाहायचे असल्याने त्यांनी आजीलाही सोबत चलण्याचा हट्ट केला. दुपारी दोन वाजता रेखा, दोन मुली, त्यांची मुले उद्यानात गेली. सहा वाजेपर्यंत उद्यानात खेळून घरी परतण्यासाठी सोबत बाहेर पडले. मात्र, रेखा यांच्या डोक्यात सिमेंटचा जड भाग कोसळून त्या जागीच गतप्राण झाल्या; पण उद्यानात सोबत खेळलेली आजी घरी परतलीच नाही. मामा, आईचे रडणे पाहून चिमुकलेही गहिवरून गेले होते.

झाडाखाली सापडली २७ वर्षीय तरुणीवादळ वाऱ्यात हर्सूल रस्त्यावर अंगावर झाड कोसळून २७ वर्षीय उर्मिला कोंडाजी धोंडकर (रा. पिसादेवी रोड, हर्सूल) या गंभीर जखमी झाल्या. सायंकाळी ५ वाजता त्या माेपेडवरून पिसादेवी रोडने जात असताना न्यू हायस्कूलजवळ रस्त्यालगतचे कवठाचे झाड अचानक त्यांच्यावर कोसळले. त्यात उर्मिला यांच्या डोके, डोळ्यास गंभीर इजा झाली. स्थानिकांनी धाव घेत त्यांना झाडाखालून काढून अतिदक्षता विभागात दाखल केले.

खेळणी, खाद्यपदार्थांचा चुराडा, आरडाओरड आणि गोंधळडोम कोसळल्यानंतर उद्यानासह बाहेरही एकच धावपळ उडाली. आणखी भिंत, झाडे कोसळण्याच्या भितीने सर्वजण सैरावैरा पळू लागले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सर्वांनीच लहान मुलांना कडेवर घेत सुरक्षित आडोसा शोधण्याचा प्रयत्न केला. फुगे, खेळणी, खारी, चणे, शेंगदाण्याच्या स्टॉल्सचा चुराडा झाला होता.

नातवामुळे आजी वाचलीगेटवरच शेख शकील यांची आजी फुगे, खेळणी विकतात. बुधवारी सायंकाळी ५ वाजता शकील आजीला डबा देण्यासाठी उद्यानात गेले. आजीला डबा खाण्यासाठी बाजूला पाठवले आणि अर्ध्या तासात डोम कोसळला तेव्हा शकील तेथेच बाजूला हेाते. त्यांनी एका चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून काढून पालकांच्या सुपूर्द केले. मात्र, उद्यानात कुटुंबासह आलेला त्यांचा चुलतभाऊ शेख अकील शेख रहिम (३२, रा. पडेगाव) हा डोमखाली सापडून गंभीर जखमी झाला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDeathमृत्यू