शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जा बेटा...बदला घेऊनच परत ये; सुटीवर आलेल्या जवानाला आई-वडिलांनी तात्काळ केले रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:10 IST

सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील कौतिक काशीनाथ पांढरे यांची दोन मुले सैन्यात आहेत.

ठळक मुद्देहल्ल्याच्या ३ दिवसांपूर्वीच अविनाश हा सुटीवर गावी आला होता. देशभक्त आई-वडिलांनी सीमेवर जाण्यास सांगितले  ग्रामस्थांनी मिरवणूक काढून पाठविले सीमेवर

- कैलास पांढरे । 

औरंगाबाद : पुलवामा हल्ल्याची बातमी कळताच सुटी घेऊन गावी आलेल्या जवानाला त्याच्या आई-वडिलांनी सुटी न भोगता चक्क देशरक्षणासाठी कर्तव्यस्थळी जाण्याचा आग्रह केला. या जवानानेही आपल्या ४४ बांधवांच्या मृत्यूमुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लगेच गाव सोडले. जा बेटा जा...बदला घेऊनच परत ये, असे म्हणून आई -वडिलांसह गावकऱ्यांनी या जवानाला सत्कार करुन सीमेवर रवाना केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथे रविवारी घडली.

सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील कौतिक काशीनाथ पांढरे यांना चार मुले असून यातील दोन मुले सैन्यात आहेत. सुधाकर हा २००९ मध्ये सीआरपीएफमध्ये  भरती झाला, तर अविनाश हा २०१५ मध्ये भरती झाला. सुधाकर सध्या ओडिशामध्ये, तर अविनाश हा जम्मूमधील नौसेरा सेक्टरमध्ये देशसेवेसाठी अहोरात्र झटत आहे. हल्ल्याच्या ३ दिवसांपूर्वीच अविनाश हा सुटीवर गावी आला होता. आठ -दहा दिवस गावाकडे राहून परिवारासोबत आपली सुटी घालवायच्या इराद्याने आलेल्या अविनाशला हल्ल्याची खबर लागली. त्याच्या वडिलांनी अविनाशला कडाडून मिठी मारुन ‘बेटा अवी, तुला आता ड्युटीवर हजर व्हायला पाहिजे’ असे म्हणून रवाना होण्यास सांगितले. 

वडिलांच्या निर्णयाचे ग्रामस्थांनी भरभरुन कौतुक केले. ग्रामस्थांनी अविनाशची गावातून मिरवणूक काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून अविनाशचा हौसला बुलंद केला. यावेळी महिलांनीही अविनाशचे औक्षण करुन देशसेवेसाठी आशीर्वाद दिला. सध्या देशावर संकट आले असून मी माझी दोन्ही मुले देशसेवेसाठी अर्पण केली असून अशा परिस्थितीत सुटी भोगण्यापेक्षा देशरक्षणासाठी जाणे महत्त्वाचे आहे, असे सांगताना अविनाशच्या वडिलांना गहिवरुन आले होते. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंतून देशभक्तीची ज्योत तेजावत होती. हे दृश्य पाहून गावात देशभक्तीची लाट आली होती. अविनाशने सर्वांचा  निरोप घेऊन रविवारी रात्रीच गाव सोडले व तो सीमेवर लढण्यासाठी रवाना झाला.

दोन महिन्यांपूर्वीच झाला साखरपुडा अविनाशचा दोन महिन्यांपूर्वीच कन्नड तालुक्यातील पळशी येथील खोटे परिवारातील तरुणीशी साखरपुडा झाला असून जेव्हा मोठी सुटी मिळेल तेव्हाच त्यांचा शुभविवाह ठरविला जाईल, असे अविनाशच्या वडिलांनी सांगितले.

पहा व्हिडिओ :

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाBorderसीमारेषाSoldierसैनिकAurangabadऔरंगाबाद