शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मोठी झेप; नॅक मूल्यांकनात ‘अ+’ श्रेणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 11:03 IST

सातजणांच्या टीमने विविध विभागांना भेट देत स्वयंमूल्यमापन अहवालानुसार तपासणी केली. 

छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास नॅककडून ‘अ +’ श्रेणी बहाल करण्यात आली आहे. विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी झालेल्या नॅक मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी मिळविली होती. पूर्वी ३.२२ गुणांसह 'अ' श्रेणी होती. आता त्यात आता वाढ झाली असून ३.३८ गुणांसह ‘अ +’ श्रेणी मिळाली आहे.

विद्यापीठाचा स्वयंमूल्यमापन अहवाल (एसएसआर) मे महिन्यात अंतिम करून तो राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडे पाठविला होता. त्यानंतर ‘नॅक पीअर टीम’ विद्यापीठात दाखल झाली. तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी विभागप्रमुखांची बैठक घेत तयारीची उजळणी केली. पाच वर्षांनंतर संपूर्ण विद्यापीठाचे मूल्यांकन बंगळुरू येथील ‘पीअर टीम’ ने तीन दिवस केले. सातजणांच्या टीमने विविध विभागांना भेट देत स्वयंमूल्यमापन अहवालानुसार तपासणी केली. 

या सात निकषांवर भरनॅक मूल्यांकनात सात निकषांवर भर देण्यात येतो. यामध्ये अभ्यासक्रमाचे पैलू, अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन, संशोधन, नवकल्पना आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिकण्याची संसाधने, विद्यार्थ्यांची प्रगती, शासन, नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्ये आणि सर्वोत्तम पद्धती, आदींचा समावेश आहे. ‘नॅक’च्या निकषांचा विचार करीत विद्यापीठाने काही विभागांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे सांगण्यात येते. ज्यामध्ये २१ विभागांचा समावेश आहे. यासह कमवा व शिका योजना, ग्रंथालय अशा विस्तार सेवांवरही भर होता.

मूल्यांकन समितीमध्ये या सातजणांचा होता समावेशमूल्यांकनासाठी प्रा. ए. एन. राय यांच्या अध्यक्षतेखालील ‘पिअर टिम’मध्ये प्रा. विमला एम या सदस्य समन्वयक आहेत. तसेच प्रा. विशाल गोयल, प्रा. रोव्हरू नागराज, प्रा. ग्यानेंद्र कुमार राऊत, प्रा. साबियासी सारखेल व प्रा. के. एस. चंद्रशेखर यांचा सदस्य म्हणून समावेश होता. २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान समितीने विद्यापीठातील विविध विभागांना भेट दिली. समितीने सकाळी ९ ते सायंकाळी नियोजित काम संपेपर्यंत पाहणी केली. यावेळी समितीने विद्यार्थी, संशोधक, माजी विद्यार्थी, पालक, विभागप्रमुख, अधिष्ठाता, कर्मचारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, आदींशी संवाद देखील साधला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर