शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

मुलींचा जन्मदर घटलेलाच!

By admin | Updated: May 28, 2017 00:31 IST

जालना : स्त्री भ्रूणहत्या रोखण्याबरोबर मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्त्री भ्रूणहत्या रोखण्याबरोबर मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न सुरू आहेत. गर्भलिंग निदान, अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कडक पावले उचलण्यात येत आहे. असे असले तरी मागील पाच वर्षात हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर वाढण्याऐवजी घटला आहे. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा या हव्यासापोटी चोरीछुपे गर्भलिंग निदान करणे, अवैध गर्भपात करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहे. औरंगाबाद शहरात अवैधरीत्या सुरू असलेल्या एका गर्भपात केंद्राचा पोलीसांनी नुकताच पर्दाफाश केला. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गर्भलिंग निदान करणे गुन्हा असून, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी औषध विक्रीचे नियमही कडक करण्यात आले आहेत. दुसरीकडे मुलींचा मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गर्र्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या विविध तपासण्या मोफत करणे, पूरक व पोषक आहार देणे, प्रसूती खर्च म्हणून रोख अनुदान देणे यासारखे पूरक कार्यक्रम राबविले जात आहे. त्याचबरोबर बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमांतर्गत मोफत शिक्षण, कन्यदान योजना यासारखे कार्यक्रम हाती घेऊन शासनस्तरावर व्यापक जनजागृती सुरू आहे. ऐवढ सगळे करूनही जालना जिल्ह्यात हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर सरासरी ११० ने कमी आहे. जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा सरासरी जन्मदर कमीच आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनस्तराव सुरू असलेल्या प्रयत्नास सामाजिक संघटनांनीही पाठबळ देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.