शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जिन रिफ्लेक्सोलॉजी दिनानिमित्त उपक्रम: ४ राज्यात राबविणार ‘स्वस्थ भारत अभियान’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 11:49 IST

१ जूनला दोंडाईचामध्ये अभियानाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: ‘आजारावर उपचार करण्यापेक्षा अधिक चांगले आहे की, आपण आजारीच पडू नाही’, या उद्देशाने इंटरनॅशनल रिफ्लेक्सोलॉजी जिन असोसिएशनतर्फे ‘जिन रिफ्लेक्सोलॉजी दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १ ते २१ जूनदरम्यान देशातील ४ राज्यात ‘स्वस्थ भारत अभियान’ राबविण्यात येणार आहे.

‘जिन रिफ्लेक्सोलॉजी दिन ते आंतरराष्ट्रीय योग दिवस’ दरम्यान हे अभियान घेण्यात येणार आहे. २१ दिवसांत ४ राज्यांतील २० शहरांत २१ सेमिनारचे नियोजन करण्यात आले आहे. ‘भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांना जिन रिफ्लेक्सोलॉजीद्वारे कसे टाळायचे, याची सविस्तर माहिती या अभियानात देण्यात येणार आहे. या अभियानाचा मीडिया पार्टनर ‘लोकमत’ आहे. हे अभियान यशस्वितेसाठी आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी जिन असोसिएशनसोबत विविध संस्था, संघटना  परिश्रम घेत आहेत. सर्व सेमिनारसाठी मुख्य वक्ते जिन रिफ्लेक्सोलॉजीचे संशोधनकर्ता  जि. रि. अनिल जैन उपस्थित राहणार आहेत.

अभियानाच्या नियोजनासाठी १० सदस्यांच्या समितीमध्ये मार्गदर्शक लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा हे आहेत. तसेच समितीत जि. रि. शिल्पा जैन, जि. रि. सपना पाटणी, जि. रि. अनुप्रिता गांधी, जि. रि. सपना गांधी, जि. रि. मोनिका काठेड, जि. रि. मयुरी सुराणा, जि. रि. अनिता सुराणा, डॉ. निर्मला पारधी यांचा समावेश आहे. अभियानातील सेमिनार नि:शुल्क असून, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच जे काही कारणास्तव सहभागी होऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी   यू-ट्यूबच्या जिन रिफ्लेक्सोलॉजी चॅनेलवर सेमिनार उपलब्ध असणार आहे.

१ जूनला दोंडाईचामध्ये अभियानाला सुरुवात

जिन रिफ्लेक्सोलॉजी दिवसानिमित्त ‘स्वस्थ भारत अभियाना’चा शुभारंभ १ जूनला दोंडाईचा (खान्देश) येथे होणार आहे. चॅरिटेबल ट्रस्टद्वारा सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. २१ जूनला छत्रपती संभाजीनगरात अभियानाची सांगता स्वस्थ भारत अभियानाची सांगता दि. २१ जून रोजी शहरात होणार आहे. तसेच नि:शुल्क प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद