औसा : तालुक्यातील जवळगा पो़ ते हारेगाव दरम्यानच्या रस्त्यावर टमटम पलटी झाला़ यामध्ये सातजण जखमी तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना १८ मे रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून, यातील गंभीर रूग्णांना पुढील उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले़ रविवारी दुपारी १२ च्या दरम्यान टमटम क्ऱ (एमएच २४ जे १५५२) हे औसा तालुक्यातील बाणेगावकडे निघाले होते़ जवळगा पो़ ते हारेगाव रस्त्यावर टमटम पलटी झाले़ यामध्ये मच्छिंद्र माने (६०), राधिका शनले (२४) दोघे रा़ हारेगाव, मीना सूर्यवंशी (४०), अक्षय गायकवाड (२०), तानाजी गाडेकर (२ महिने) हे पाचजण जखमी झाले़ या सर्वांवर औसा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले़ तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले़ वैैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या पत्रावरून औसा पोलिसांनी अपघाताची नोंद केली असली तरी अपघात कोठे घडला, याची माहिती ठाणे अंमलदारांकडे नव्हती़ अपघाताचे ठिकाण किल्लारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे सांगून दुर्लक्ष केले़ तर किल्लारी पोलिसांशी संपर्क केला असता त्यांच्याकडे कुठल्याही अपघाताची नोंद नसलयाचे त्यांनी सांगितले़
टमटम उलटून ७ जखमी, २ गंभीर
By admin | Updated: May 19, 2014 01:06 IST