लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अपघात विभाग, सर्जिकल इमारत, महाविद्यालयात प्रवेश करताच मोबाइल निरुपोयोगी होतात. रेंजअभावी ना ‘इन्कमिंग’ कॉल येतात, ना ‘आऊट गोइंग’ कॉल करता येतात. यामुळे अत्यावश्यक वेळी रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर डॉक्टरांनाही प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागतआहे.घाटी रुग्णालयातील अपघात विभाग आणि सर्जिकल इमारतीमधील विविध वॉर्डांमध्ये दाखल झालेले रुग्णांच्या नातेवाईकांना गरजेच्या वेळी मोबाइलद्वारे मदत मागविणे अशक्य होत आहे. इमारतींमध्ये रेंजच येत नसल्याने मोबाइल ठप्प होतो. त्यामुळे रेंजच्या शोधात थेट इमारतींबाहेर जाण्याची कसरत करावी लागते. याच परिस्थितीला डॉक्टरांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे नातेवाईकांकडून आरोप- प्रत्यारोप, वाद घातले जात असताना तात्काळ सुरक्षा यंत्रणेला माहिती देणेही अशक्य होते.
घाटी ‘आऊट आॅफ कव्हरेज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:45 IST