शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

गेटकेन लग्नाचे नाट्य रचून नवरदेवाला लुटले; सासू-सासरे, वऱ्हाडी सारेच बनावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:16 IST

लग्नासाठी वराच्या माता-पित्यांना दीड लाख रुपये रोख हुंडा आणि वधूच्या अंगावर सोन्याचे दागिने व शालू घालण्यासही तिने सांगितले.

ठळक मुद्देमुकुंदवाडी पोलिसांनी पार पाडले ‘कर्तव्य’  विवाहेच्छुक १० तरुणांना घातला गंडा

औरंगाबाद : मंदिरात सात फेरे घेण्याचे नाट्य वठल्यानंतर १ लाख ५० हजार रुपये व अंगावरील  सोन्या-चांदीच्या  दागिन्यांसह धूम ठोकणाऱ्या वधूसह तिच्या बनावट नातेवाईकांना मुकुंदवाडी पोलिसांनी चतुर्भुज केले. लग्न न जुळणाऱ्या तरुणांना हेरून गेटकेन लग्नाचे नाटक वठवून ही टोळी पैसे व दागिने घेऊन पोबारा करीत होती. 

या टोळीची सूत्रधार सविता राधाकिसन माळी ही असून, तिच्यासह संगीता विश्वनाथ वैद्य, अर्चना देवीदास ढाकणे, पूजा अजय राजपूत आणि रवी तेजराव राठोड या आरोपींना अटक करण्यात आली. गणेश भाऊसाहेब पवार (२७, रा. कारेगाव, ता.श्रीरामपूर) या तरुणाच्या लग्नासाठी वधूचा शोध सुरू होता. महिनाभरापूर्वी गणेशच्या भावजयीला सविताने फोन करून ३ ते ४  मुलींचे स्थळ सुचविले.  काही  मुलींची छायाचित्रे आणि आधार कार्ड तिने पाठवले.  अर्चना शिंदे ही मुलगी त्यांना पसंत पडली. 

आई-बाबांसह सर्वच बनावट सविताने अर्चनाचा बनावट टीसी व्हॉटस्‌ॲपवर पाठवला. लग्नासाठी वराच्या माता-पित्यांना दीड लाख रुपये रोख हुंडा आणि वधूच्या अंगावर सोन्याचे दागिने व शालू घालण्यासही तिने सांगितले.  मुलगी स्वजातीय असल्यामुळे वर पक्षाने  होकार कळविला. कोरोनामुळे  एकाच दिवसात लग्न करायचे असल्याचे सांगून संगीताने वऱ्हाडींना औरंगाबादेत बोलावले.  नवरदेव  गणेशसह  भाऊ, भावजयी मित्रमंडळी वाहनाने  रविवारी औरंगाबादेत  आले.  

कुंभेफळ येथील मंदिरात लग्न वऱ्हाडी येथे आल्यावर वधू अर्चना, तिचे बनावट आई-बाबा, मामा आणि अन्य नातेवाईक वऱ्हाडींना कुंभेफळ येथील नवनाथ मंदिरात घेऊन गेली. तेथे गणेश आणि अर्चनाचे लग्न लावण्यात आले. सविताने गणेशच्या भावाकडून रोख दीड लाख रुपये घेतले. यानंतर वेगवेगळे बहाणे करून सविता आणि तिचे साथीदार तेथून पसार झाले. वधू अर्चनानेही रस्त्यात कार थांबवण्यास सांगून धूम ठोकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वऱ्हाडींनी मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, उपनिरीक्षक सुनील चव्हाण, अमोल मस्के, बाबासाहेब कांबळे, संतोष भानुसे, विलास मुठ्ठे, मनोहर गिते आणि महिला कर्मचारी कुंडकर यांनी  रात्रभर शोध घेऊन आरोपींना पकडले. या टोळीने तब्बल दहा तरुणांना असेच फसविल्याचे समोर आले. त्यांच्याकडे मुलींच्या वेगवेगळ्या नावांची कागदपत्रेही पोलिसांना सापडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादmarriageलग्नfraudधोकेबाजी