या माध्यमातून नव्या वर्षात नव्या प्रतिभांना संधी मिळणार आहे. त्यामुळे नृत्य, गाणे आणि मॉडेलिंग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा.
३ ते २५ वर्षे या वयोगटातील प्रत्येक जण ही ऑडिशन देऊ शकतात. ऑडिशनसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उल्कानगरी परिसरातील जय विश्वभारती कॉलनी येथील जय भवानी हायस्कूल येथे हे ऑडिशन होणार आहे.
चौकट :
टीव्ही प्रोमो जाहिरात
शूट करण्याची संधी-
ऑडिशनमध्ये यशस्वी झालेल्या कलाकारांना टीव्ही प्रोमो आणि जाहिरातीसाठी शूट करण्याची संधी मिळणार आहे. निवड झालेल्या कलाकारांचे ट्रेनिंग आणि ग्रुमिंग सेशन २३ ते २७ फेब्रुवारी याकाळात होईल आणि २८ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष शूटिंग होईल. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क- ९८०७७२२२५५, ९३७३२३१४८९.