शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
3
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
5
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
6
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
7
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
8
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
9
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
10
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
11
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
12
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
13
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
14
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
15
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
16
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
17
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
18
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू

औरंगाबादच्या रेल्वेस्थानकाची दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बुधवारी करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 7:39 PM

महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यातून मराठवाड्यातील रेल्वेसंदर्भात प्रश्न सुटणार की, पाहणीचे सोपस्कार पूर्ण केले जातील ?

ठळक मुद्देमहाव्यवस्थापकांचा वार्षिक दौरा मराठवाड्यातील प्रश्न सुटणार ?

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा १२ डिसेंबर रोजी नगरसोल ते परभणीदरम्यान वार्षिक पाहणी दौरा आहे. यामध्ये औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ११० मिनिटांचा दौरा असणार आहे. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यातून मराठवाड्यातील रेल्वेसंदर्भात प्रश्न सुटणार की, पाहणीचे सोपस्कार पूर्ण केले जातील, याकडे प्रवाशांसह प्रवासी संघटनांचे लक्ष लागून आहे.

‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा बुधवारी नगरसोल येथून पाहणी दौरा सुरू होईल. नगरसोल, तारूर, रोटेगाव, परसोडा, करंजगाव, लासूर, पोटूळमार्गे दुपारी १२.१० वाजता औरंगाबाद स्थानकावर महाव्यवस्थापक पोहोचतील. पाहणी दौऱ्यात सर्वाधिक वेळ हा औरंगाबाद स्थानकाला देण्यात आला आहे. याठिकाणी गँगमन टूल रूमचे उद््घाटन, ट्रॅकमन्सला टूल कीटचे वितरण करण्यात येईल. त्यानंतर स्थानकाची पाहणी केली जाईल. रेल्वे कॉलनीच्या पाहणीनंतर महाव्यवस्थापक प्रवासी, नागरिकांबरोबर संवाद साधणार आहेत.  औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून दुपारी २ वाजता विनोदकुमार यादव चिकलठाणा, करमाड, बदनापूरच्या दिशेने मार्गस्थ होतील. त्यानंतर जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी येथे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यामुळे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील विविध कामे करण्यावर भर दिला जात आहे. कोणत्याही त्रुटी निघणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात आहे. 

अनेक प्रश्न रेंगाळलेलेरेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, मुंबई, दिल्लीसह विविध शहरांसाठी नव्या रेल्वे सोडणे, नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडणे, औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा यासह मराठवाड्यातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळले आहेत. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यामुळे हे प्रश्न सुटणार आहेत, की केवळ पाहणीचे सोपस्कार पूर्ण केले जातील, असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.  

टॅग्स :Aurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनpassengerप्रवासीMarathwadaमराठवाडा