शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगर शासकीय अभियांत्रिकीच्या प्राचीची भरारी! ॲमेझॉनमध्ये मिळाले ४५ लाखांचे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 16:10 IST

GECA च्या इतिहासात पहिल्यांदाच 'सेमिस्टर स्वॅप'; विद्यार्थिनीच्या करिअरसाठी महाविद्यालयाने मोडले जुने नियम.

छत्रपती संभाजीनगर: येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (GECA) शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संगणकशास्त्र व अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी प्राची गटलेवार हिची जगप्रसिद्ध 'ॲमेझॉन' कंपनीत ४५ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे. प्राचार्य डॉ. संजय डंभारे यांनी या यशाची अधिकृत माहिती दिली. विशेष म्हणजे, प्राचीची ही संधी हुकण्याची शक्यता असताना महाविद्यालयाने घेतलेल्या एका ऐतिहासिक शैक्षणिक निर्णयामुळे तिला हे यश गाठता आले आहे.

'सेमिस्टर स्वॅप'चा ऐतिहासिक निर्णयप्राचीला ॲमेझॉन कंपनीने सातव्या सत्रात (7th Semester) असतानाच सहा महिन्यांच्या इंटर्नशीपची ऑफर दिली होती. मात्र, महाविद्यालयाच्या नियमानुसार केवळ आठव्या सत्रातच इंटर्नशीपला जाण्याची मुभा असते. ही तांत्रिक अडचण प्राचीच्या करिअरमध्ये मोठा अडथळा ठरू शकली असती. मात्र, संगणकशास्त्र विभाग आणि विद्या शाखा परिषदेने विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन 'सेमिस्टर स्वॅप'चा (सत्र अदलाबदल) ऐतिहासिक पर्याय उपलब्ध करून दिला. यामुळे प्राचीला सातव्या सत्रातच इंटर्नशीपला जाता आले आणि तिने तिथे आपल्या कौशल्याने नोकरी पक्की केली.

महाविद्यालयाकडून विशेष सन्मानप्राचीने मिळवलेले हे यश महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. संजय डंभारे, विभागप्रमुख डॉ. विकुल पवार आणि इतर वरिष्ठ प्राध्यापकांच्या उपस्थितीत प्राचीचा विशेष सत्कार करण्यात आला. "विद्यार्थ्यांना जागतिक संधी मिळवून देण्यासाठी महाविद्यालय नेहमीच नियमांच्या चौकटीबाहेर जाऊन प्रयत्नशील असते," असे मत प्राचार्य डंभारे यांनी यावेळी व्यक्त केले. प्राचीला मिळालेल्या या भरघोस पॅकेजमुळे शैक्षणिक वर्तुळात तिचे मोठे कौतुक होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : GECA's Prachi Soars: Lands ₹45 Lakh Package at Amazon!

Web Summary : Prachi Gatlewar from GECA, Chhatrapati Sambhajinagar, secured a ₹45 lakh Amazon package. A unique 'semester swap' allowed her to intern early, leading to her success. The college celebrated her achievement, highlighting their commitment to student opportunities.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducationशिक्षणamazonअ‍ॅमेझॉन