शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गायके यांचा कारमधून अपहरणाचा प्रयत्न, चौघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:33 IST

मॉर्निंग वॉकसाठी निघालेले अ‍ॅड. सदाशिव अंबादास गायके (७१) यांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून त्यांना कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास कोकणवाडी येथे घडली. याप्रकरणी गायके यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात चार अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देकोकणवाडी येथील घटना : वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

औरंगाबाद : मॉर्निंग वॉकसाठी निघालेले अ‍ॅड. सदाशिव अंबादास गायके (७१) यांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून त्यांना कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास कोकणवाडी येथे घडली. याप्रकरणी गायके यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात चार अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.वेदांतनगर पोलिसांनी सांगितले की, कोकणवाडी परिसरातील श्री कॉलनीमधील रहिवासी अ‍ॅड. सदाशिव गायके हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ६.४० वाजेच्या सुमारास फिरायला गेले होते. कोकणवाडी येथील रस्त्याने जात असताना घोड्याच्या तबेल्याजवळ लाल रंगाच्या कारमधून उतरलेल्या चार जणांपैकी एकाने त्यांना घट्ट पकडले, तर दुसऱ्याने त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावली आणि अन्य दोघांनी त्यांना बळजबरीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. रिव्हॉल्व्हरधारी अ‍ॅड. गायके यांना म्हणाला की, सुरेश पाटील, नितीन पाटील आणि जयराम साळुंके यांच्याविरोधात तक्रार करतो का, तुला आज जिवंत सोडणार नाही. गायके यांनी आरडाओरड करीत प्रतिकार केल्याने परिसरातील एक महिला आणि जनार्दन तांबे, रमेश तांबे मदतीसाठी पळत आले. लोक येत असल्याचे पाहून अपहरणकर्ते कारमध्ये बसून पंचवटीच्या दिशेने पळून गेले. घटनेच्या वेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जयराम साळुंके व सुरेश दयाराम पाटील हे होते. या झटापटीनंतर ते निघून गेल्याचे गायके यांनी तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून वेदांतनगर ठाण्यात अनोळखी चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाटील तपास करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणAurangabadऔरंगाबाद