शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातून येतात मराठवाड्यात गावठी कट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 12:55 IST

१५ ते ४० हजार रुपयांपर्यंतच्या किमतीत होते विक्री

ठळक मुद्देअहमदनगरसह मराठवाड्यात तस्करी

- बापू सोळुंके

औरंगाबाद : दहा दिवसांत औरंगाबाद शहरामध्ये गोळीबार घटना घडल्या. गोळीबार करण्यासाठी वापरलेले शस्त्रे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसले तरी गावठी पिस्तुलातून या गोळ्या झाडल्या असाव्यात असा संशय अधिकाऱ्यांना आहे. मराठवाडा आणि लगतच्या नगर जिल्ह्यात मध्यप्रदेशातून तस्करी होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरात जालाननगर येथे तरुणावर झालेला गोळीबार आणि देवानगरीजवळील पीडब्ल्यूडी सोसायटीमध्ये बांधकाम ठेकेदारावर झाडण्यात आलेली गोळी या दोन घटनांमुळे शहरात खळबळ उडाली होती.  गावठी पिस्टल अथवा कट्ट्यातून या गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा  होता.  औरंगाबाद शहरात आणि शेजारील नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शस्त्र तस्करी होते. मध्यप्रदेशातून १५ हजार ते ४० हजार रुपये पर्यंतच्या किमतीला ही देशी कट्टे मिळतात. गावठी कट्टे कमरेला लटकवून आणि दहशत निर्माण करण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे लोक खरेदी करतात. पंधरा दिवसांपूर्वी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाचोड येथे एका अट्टल दरोडेखोराला गावठी कट्टा सह पकडले होते.

यापूर्वीही शहर पोलिसांच्या तावडीतून सोडविण्यासाठी इमरान मेंदीला समर्थकांना गावठी कट्ट्यासह अटक केली होती. तर महिनाभरापूर्वी चिकलठाणा पोलिसांनी एका तरुणाला गावठी कट्ट्यासह पकडले.गावठी कट्टे आणि पिस्टलची गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये क्रेझ आहे. वाळू माफिया आणि त्यांच्याकडे काम करणारे गुन्हेगार अशा प्रकारचे शस्त्रे बाळगतात. लुटमार करण्याच्या उद्देशाने दरोडेखोर गावठी कट्टे सोबत ठेवतात.

सीमकार्ड वापरून फेकून देतात शस्त्र तस्कर गावठी पिस्टल आणि कट्ट्याची खरेदी-विक्री करताना दुसऱ्याच्या नावे सीमकार्ड खरेदी करून वापरतात आणि काम झाल्यानंतर कार्ड फेकून देतात.  यामुळे बऱ्याचदा त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचत नाहीत. 

दहा महिन्यांत ९ गावठी कट्टे जप्त यावर्षी बीड येथे गावठी कट्टे नेणाऱ्या लोकाना फुलंब्री येथे पकडून त्यांच्याकडून ३ कट्टे जप्त केले होते. सिल्लोडमध्ये २,  पाचोड येथे १, तर आणि चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलावर कारवाई करून गावठी पिस्टल जप्त केले. 

खाजगी वाहनाने आणून चोरट्या मार्गाने विक्रीगावठी कट्टे मध्यप्रदेशातील सेंदवा आणि परिसरातील जंगलालगतच्या गावांतून चोरट्या मार्गाने खरेदी करून आणले जातात.  मध्यप्रदेशातील काही गावांत छुप्या पद्धतीने गावठी पिस्टल आणि कट्टे तयार केले जातात. या कट्ट्यांची जळगावमार्गे ट्रॅव्हल बसमधून, तर काही लोक खाजगी वाहनाने आणून  विक्री करतात.  १० ते ४० हजार रुपयांपर्यंत या शस्त्रांचा दर असतो. -भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद