शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गौताळा अभयारण्याची होतेय कचराकुंडी; क्विंटलभर प्लास्टिक अन् दारूच्या रिकाम्या बाटल्या जमा

By साहेबराव हिवराळे | Updated: October 6, 2022 15:04 IST

हिवरखेडा व पूरणवाडी परिसरात जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला.

औरंगाबाद : गौताळा अभयारण्यात शहरातील नागरिकांच्या सहली सर्रास सुरू आहेत. गांधी जयंती आणि वन्यजीव सप्ताहात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी तेथे केरकचरा गोळा करताना त्यांचेही डोळे विस्फारले.

पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून असा कचरा टाकला जातो. त्यामुळे ऑक्सिजन हबदेखील धोक्यात येण्याची भीती आहे. कोरोनाकाळात नागरिकांना ऑक्सिजन हब आणि वृक्षारोपणाची महती समजली; पण आता ते गांभीर्यच जणू हरवले आहे. सामाजिक विषयावर प्रबोधन करणाऱ्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हिवरखेडा व पूरणवाडी परिसरात जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी कचरा गोळा केला. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले, वनपाल प्रवीण पारखी, कांतीलाल रायसिंग, सुनील देशमुख आदींनी कचऱ्याच्या ८ ते १० गोण्या भरून जमा केल्या आहेत. हे श्रमदान बुधवारी दिवसभर करण्यात आले.

अनेकांवर दंडात्मक कारवाई...पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी यावे. प्लास्टिक कचरा, दारूच्या बाटल्या टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली होती. त्याचा धसका पर्यटकांनी घेतला होता. पुन्हा तशीच कारवाई करणार आहोत.- राजेंद्र नाळे, वन्यजीव विभाग अधिकारी

वन्यजीव सप्ताह गुपचूप करण्यात काय अर्थ?वन्यजीव सप्ताह सुरू झाला असला तरी त्याचा गवगवा नेहमीसारखा यंदा झालेला नाही. खऱ्या अर्थाने निसर्ग आणि वन्यजीव यांच्याविषयीचे ज्ञान शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठांनाही कळले पाहिजे.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य

टॅग्स :forest departmentवनविभागAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न