शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील गॅस्ट्रोच्या उद्रेकाची राज्यभरात झाली गंभीर नोंद; आरोग्य संस्थांना दक्षतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 14:59 IST

शहरातील छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाची राज्यभरात गंभीर नोंद घेण्यात आली. इतरत्र अशी परिस्थिती उद््भवू नये, उद््भवल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी आरोग्य संस्थांनी दक्ष राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देछावणी परिसरात १० नोव्हेंबरपासून एकाच वेळी अनेकांना अतिसार, पोटदुखी, उलटी असा त्रास सुरू झालाविभागीय स्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाला या भागात पाचारण करण्यात आले. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. छावणीतील परिस्थितीचा अहवाल राज्यपातळीवर कळविण्यात आला आहे.

औरंगाबाद : शहरातील छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाची राज्यभरात गंभीर नोंद घेण्यात आली. इतरत्र अशी परिस्थिती उद््भवू नये, उद््भवल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी आरोग्य संस्थांनी दक्ष राहण्याची सूचना करण्यात आली आहे. छावणीतील गॅस्ट्रोच्या परिस्थितीचा अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाने राज्य पातळीवर कळविला आहे.

छावणी परिसरात १० नोव्हेंबरपासून एकाच वेळी अनेकांना अतिसार, पोटदुखी, उलटी असा त्रास सुरू झाला. रुग्णांची संख्या पाहता पाहता चार हजारांवर पोहोचल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. विभागीय स्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाला या भागात पाचारण करण्यात आले. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी नऊशेवर घरांना भेट देण्यात आली. हा उद्रेक गॅस्ट्रोएनट्रायटिसचा असल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यात प्रथमच इतक्या संख्येने गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले. २७ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिल्याची भावना छावणी सामान्य रुग्णालयातील आरएमओ डॉ. गीता मालू यांनी सांगितले.

छावणी परिषद असो की, आरोग्य विभाग या सगळ्या विभागातील अधिकारी या गंभीर परिस्थितीचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. औरंगाबादेतील या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. इतर ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये,यासाठी जलव्यवस्थापनाबरोबर आरोग्य विभागाने दक्ष राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने गॅस्ट्रोच्या प्रकरणाची राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये नोंद झाली आहे, अशा परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा धडा घेणार असल्याचे दिसते.

राज्यपातळीवर अहवालछावणीतील परिस्थितीचा अहवाल राज्यपातळीवर कळविण्यात आला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत हा अहवाल देण्यात आला आहे. यास अधिका-यांनी दुजोरा दिला आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीGovernmentसरकार