शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या सिलेंडरमधून कारमध्ये भरला गॅस; गाडी सुरू करताच किटमध्ये स्फोट, तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:00 IST

सिल्लोड शहरातील घटनेत एका शेळीचा मृत्यू झाला

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : शहरातील आझादनगरमध्ये मारुती ओम्नी कारमध्ये घरगुती वापराचा गॅस भरताना झालेल्या स्फोटात पिता-पुत्रासह १२ वर्षांचा मुलगा, असे तिघ गंभीर जखमी झाले, तर एका शेळीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी ११:३० वाजेच्या सुमारास घडली.

सिल्लोड शहरातील आझादनगरमध्ये बुधवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास शेख आझम नबी शेख (वय ३५ वर्षे), नबी अमीर शेख (वय ५६ वर्षे) हे त्यांच्या मारुती कारमध्ये (क्र एमएच ०९ जी ५७००) घरगुती वापराचा गॅस भरत होते. दोन सिलिंडर भरल्यावर तिसरा सिलिंडर भरताना गॅस किटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गॅस भरला गेला. यावेळी कारमध्ये बसलेले नबी अमीर शेख यांनी कार सुरू केली. यावेळी कारमधील गॅस कीटचा स्फोट झाला व काही क्षणातच कारने पेट घेतला. त्यामुळे आगीचा भडका उडाला. हे पाहून आझम शेख हे त्यांचे वडील नबी आमिर शेख यांना वाचवण्यासाठी पुढे आले. यावेळी कारमधून वडिलांना उतरवत असताना तेही आगीत होरपळून निघाले. तर तेथे बाजूला उभा असलेला शेख असद अकील (वय १२ वर्षे) हा मुलगाही भाजला गेला.

या घटनेत तिघेही २० ते २५ टक्के भाजले, तर बाजूलाच असलेल्या शेळीचा भाजून मृत्यू झाला. यावेळी जवळच्या नागरिकांनी पाण्याच्या साहाय्याने कारला लागलेली आग विझविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे त्यांना कठीण झाले. बरेच शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली.

घाटीत उपचार सुरूदरम्यान, या घटनेत भाजलेले शेख आझम नबी शेख, नबी अमीर शेख व शेख असद अकील यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे आरोग्य अधिकारी डॉ. राम मोहिते यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तिघांनाही छत्रपती संभाजीनगर येथी घाटी रुग्णालयात रेफर केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात