शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गॅस टंचाईची झळ अनाथाश्रमांनाही, चिमुकल्यांच्या जेवणासाठी पेटल्या चुली; संस्थाचालकांपुढे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 19:59 IST

प्रशासनाचे प्राधान्याने गॅस देण्याचे आश्वासन हवेत

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गॅस टंचाईचा मोठा फटका आता निराधार आणि अनाथ मुलांना बसू लागला आहे. अनाथाश्रम आणि मुला-मुलींच्या वसतिगृहांना प्राधान्याने गॅस पुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन फोल ठरले असून, गॅसअभावी अनेक सामाजिक संस्थांना नाइलाजाने चूल पेटवावी लागली आहे. काही ठिकाणी गॅस पूर्णपणे संपला आहे, तर काही ठिकाणी तो संपण्याच्या मार्गावर असल्याने चिमुकल्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न कसा सोडवायचा, या चिंतेत संस्थाचालक आहेत.

भगवान बाबा बालिकाश्रमात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. येथे १०० मुली, ४० मुले आणि कर्मचारी अशा एकूण १६० जणांचा रोजचा स्वयंपाक बनतो. एवढ्या मोठ्या संख्येमुळे त्यांना दर दोन दिवसाला एका सिलिंडरची आवश्यकता असते. मात्र, सध्या गॅस संपला असून, अनेक प्रयत्न करूनही नवीन सिलिंडर मिळालेला नाही. त्यामुळे या आश्रमात आता चूल मांडून स्वयंपाक करण्याची वेळ आली असल्याचे संचालिका कविता वाघ यांनी सांगितले.

गॅस वाचवण्याची काटकसरवसंतराव नाईक बालगृहात दर १५ दिवसांना एका सिलिंडरची गरज भासते. सध्या त्यांच्याकडे केवळ काही दिवस पुरेल एवढाच गॅस शिल्लक आहे. सिलिंडरचा तुटवडा पाहता गॅस वाचवण्यासाठी काही पदार्थ आता चूल पेटवून बनवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती अधीक्षिका मीनाक्षी आस्कर यांनी दिली. तीच स्थिती श्री स्वामी समर्थ बालगृहाची आहे. येथे २५ मुले राहतात. त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून आधीच चुलीवर स्वयंपाक बनवण्यास सुरुवात केली आहे. व्यंकटेश बालगृहात २० मुले असतात. येथील गॅस दोन दिवसांत संपेल, मात्र पर्यायी व्यवस्था अजून झालेली नाही.

१५ दिवसांनंतर काय?बाबासाई एड्सग्रस्त मुला-मुलींच्या आश्रमात सध्या १७ मुले आहेत. त्यांच्याकडे पुढील १५ दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे. या आजारात मुलांच्या आहाराची आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र, पंधरा दिवसांनंतर गॅस उपलब्ध न झाल्यास काय करायचे, असा प्रश्न आश्रमाचे संचालक नितीन वाकुर्डे यांनी उपस्थित केला.

अडचण दूर करण्यास प्रयत्नशीलपुरवठा अधिकाऱ्यांना सर्व अनाथाश्रम आणि सामाजिक संस्थांना वेळेवर गॅस पुरवठा करण्याबाबत अधिकृत पत्र दिले आहे. कोणाचीही अडचण होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहोत.- महेंद्र दराडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Shortage Hits Orphanages; Cooking on Stoves for Children

Web Summary : Gas shortage severely impacts orphanages in Sambhajinagar. Promised supplies failed, forcing institutions to use wood-burning stoves. Facing scarcity, orphanages struggle to feed children, seeking urgent solutions from authorities to avert crisis.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर