शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रतीक्षेची गुढी’, गुढीपाडव्याचा गोडवा गॅसच्या रांगेत हरवला; ऐन सणात गृहिणींचा स्वयंपाक अर्ध्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 14:10 IST

"दारात पाहुणे, चुलीवर धूर अन् हातात रिकामे सिलिंडर!"; गुढीपाडव्याचा गोडवा गॅसच्या रांगेत, उन्हाच्या चटक्यांमध्ये हरवला...

- प्राची पाटीलछत्रपती संभाजीनगर : मराठी नववर्षाची सुरुवात... दारात सप्तरंगी रांगोळी, उंचावर डौलाने फडकणारी गुढी आणि घरात गोडाधोडाच्या स्वयंपाकाची लगबग. गुढीपाडव्याचे हे नेहमीचे चित्र यंदा अनेक घरांमध्ये मात्र वेगळेच होते. ऐन सणाच्या दिवशी गॅस सिलिंडर संपल्याने आनंदाची गुढी उभारण्याऐवजी, कडक उन्हात गॅससाठी तासनतास ‘प्रतीक्षेची गुढी’ उभारण्याची वेळ शेकडो नागरिकांवर आली. लोकमतने शहरातील काही ठिकाणी पाहणी केली असता सणाचा गोडवा हा गॅसच्या रांगेत आणि उन्हाच्या चटक्यांमध्ये हरवून गेल्याचे पाहायला मिळाले.

चिकलठाणा येथील योगेश्वरी गॅस सेंटरबाहेर सकाळी ८ वाजेपासून लागलेली महिलांची रांग विदारक वास्तव मांडत होती. कार्यालय उघडले थेट ११ वाजता. रांगेत हताशपणे उभ्या असलेल्या पुष्पा दौड उद्वेगाने म्हणाल्या, सकाळपासून चहाचा एक घोटही घेतला नाही. घरात सगळा पसारा तसाच टाकून आले. आता बारा वाजलेत, तरी नंबर लागलेला नाही. घरी जाऊन गोडाचा स्वयंपाक कधी करणार आणि सण कधी साजरा करणार? रंजना गांगुर्डे यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. त्या म्हणाल्या, सणाच्या दिवशी सकाळीच गॅस संपला.

दारात पाहुणे...शहरातील एपीआय कॉर्नर, एन-६, बजरंग चौक या सर्वच ठिकाणी चित्र कमी-अधिक फरकाने सारखेच होते. एपीआय कॉर्नर येथील भारत गॅस कार्यालयासमोर वेगळीच शोकांतिका पाहायला मिळाली. एजन्सीचे मालक गंगाधर काकडे यांच्या निधनामुळे कार्यालय बंद होते. मात्र, गॅसच्या आशेने वाळूज, देवळाई, साताऱ्याहून आलेले नागरिक रिकाम्या हाताने परतत होते. वाळूजचे राजेश जाधव हताश होऊन इकडे आले होते. तर, दिलीप कांबळे यांच्या घरी सणासाठी पाहुणे आले होते. पाहुण्यांना घरात बसवून ते गॅसच्या शोधात वणवण भटकत होते.

- वृद्ध उन्हातचिकलठाण्यात चक्क ७० वर्षांचे वृद्ध छगन आव्हाळे पाडव्याच्या दिवशी कडक ऊन सहन करत गॅससाठी रांगेत उभे होते. कल्याण थोरात यांचा स्वयंपाक गॅसवर अर्धाच झाला होता आणि गॅस संपला. उरलेला स्वयंपाक पूर्ण करण्यासाठी ते घाईघाईने सिलिंडर मिळवायला आले होते. बबिता नाडे यांचा गॅस चक्क ८ दिवसांपूर्वी संपला होता. ८ दिवस चुलीवर धूर खात स्वयंपाक केल्यानंतर पाडव्याला तरी गॅस मिळेल ही आशा होती, पण आजही त्यांना आणखी ८ दिवस लागतील असेच उत्तर मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Gudi Padwa's sweetness lost in gas queues; cooking incomplete!

Web Summary : Gudi Padwa celebrations were marred as gas shortages left many families struggling. Long queues formed at gas agencies, disrupting festive cooking. Some agencies were closed, leaving people, including the elderly, stranded and unable to prepare traditional dishes.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर