शहरं
Join us  
Trending Stories
1
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
2
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
3
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
4
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
5
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
6
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
7
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
8
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
9
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
11
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
12
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
13
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
14
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
15
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
16
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
17
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
18
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
19
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
20
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली

गरुडा Vsडुग्गा! संक्रांतीला अहमदाबाद-छत्रपती संभाजीनगराच्या पतंगांची रंगणार बाजी

By प्रशांत तेलवाडकर | Published: January 11, 2024 11:37 AM

छत्रपती संभाजीनगरातील खानदानी कारागिरांनी बनविलेल्या तावाच्या पतंगाची टक्कर गुजरातमधून आलेल्या डिझाइनर पतंगाशी होणार

छत्रपती संभाजीनगर : नववर्षाचा पहिला सण संक्रांतीला आकाशात अहमदाबादचे पतंग आणि छत्रपती संभाजीनगरच्या पतंगांमध्ये जोरदार बाजी रंगणार आहे. शहरातील खानदानी कारागिरांनी बनविलेल्या तावाच्या पतंगाची टक्कर गुजरातमधून आलेल्या डिझाइनर पतंगाशी होणार असल्याने या पतंगबाजीत कोण जिंकणार, याकडे पतंगप्रेमींचे लक्ष लागले आहे.

गुजरातहून शहरात आले गरुडगुजरातमधून ‘गरुडा’च्या आकारातील पतंग आले आहेत. हे कागदाच्या तावापासून नव्हे तर पॅरेशूट मटेरियलपासून बनविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात कामट्यांऐवजी फायबर व ॲल्युमिनियमच्या काड्यांचा वापर करण्यात आला आहे. ८० ते ५०० रुपये प्रतिनगाने हे पतंग विकले जात आहेर.

छत्रपती संभाजीनगरचा ब्रँडछत्रपती संभाजीनगरच्या पतंगाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कमी दाबाच्या पट्ट्यात उडतील, असे पतंग येथील खानदानी कारागीर बनवत आहेत. कागदी ताव वापरला जातो, तुळसीपूरहून येणारी कामटीला सोलून पातळ केली जाते. कमी हवेत उडण्यासाठी कामटीला किती ताणायचे, येथेच कारागिराचे कौशल्य पणाला लागते. पतंगाच्या कडेला कागद दडपून त्यात दोरा भरला जातो. यामुळे पतंग लवकर फाटत नाही. हे पतंग चांगल्या प्रकारे आकाशात उडतात. अवघ्या ५ ते ८० रुपयांपर्यंत हे पतंग विकतात. छत्रपती संभाजीनगरच्या पतंगाचा ब्रँड बनला आहे.

४० लाख पतंगांची थप्पीसंक्रांत सण आठ दिवसांवर आहे. शहरात ५३ खानदानी कारागीर परिवारांनी वर्षभरात ५० लाख पतंग तयार केले आहे. तर १५ होलसेलर पतंगाची विक्री करतात. यंदा जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, निजामाबाद येथील होलसेल विक्रेत्यांनी पाठ फिरवली. ढगाळ वातावरणामुळे पतंग खरेदी थांबली आहे. त्यात मागील वर्षीच्या तुलनेत पतंगाचे भाव पाच टक्क्यांनी वाढले आहेत. या सर्वाचा परिणाम विक्रीवर झाला असून विक्रीविना डुग्गा, पौना, ढाच्चा अशा ४० लाख पतंगाची थप्पी लागली आहे. कारागीर व विक्रेते चिंतीत आहेत.-सय्यद अमिनोद्दीन, पतंग होलसेलर

एक कुटुंब रोज बनवते ५०० पतंगआमच्या कुटुंबात ६ जण पतंग बनवितात. दररोज आम्ही ५०० पतंग बनवतो. त्यात गुजरातहून पतंग विक्रीला आले आहेत. आता मॉलमध्येही पतंग विकले जात आहेत. याचा परिणामही जाणवत आहे.-अनिल राजपूत, पतंग, कारागीर

डिझायनर पतंगांचे आकर्षणशहरात अजूनही पारंपरिक पद्धतीने पतंग बनविले जात आहेत. मात्र, अहमदाबादहून येणाऱ्या डिझायनर पतंगांत नावीन्य दिसत आहे. पारंपरिक पतंगाला छेद देऊन पॅरेशूट मटेरियलपासून पतंग बनविले जात आहेत. शिवाय जिलेटिन, रेनबो कलर अशा ‘जरा हटके’ पतंगांना पसंती मिळत आहे.-राहुल गुगळे, होलसेल व्यापारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादkiteपतंगMakar Sankrantiमकर संक्रांती