शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कचरा दिसेल तेथे पेटवा, खड्डा असेल तेथे गाडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:26 IST

कचऱ्याचे ढीग जेथे दिसतील तेथे पेटवून द्या, जेथे खड्डा असेल तेथे गाडून टाका,असे बेकायदेशीर तंत्र शहरातील चोहोबाजूंनी सुरू झाले आहे. विल्हेवाटीची ही प्रक्रिया शहराचे आरोग्य धोक्यात आणणारी असून, रोजाबाग परिसरातील खुल्या जागेत कचरा पुरण्यास नागरिकांनी विरोध करताच तेथील नगरसेवकाने दांडगाईने त्या परिसरात कच-याचे ट्रक रिकामे केले.

ठळक मुद्देऔरंगाबादेत विल्हेवाटीचे नवे तंत्र: रोजाबागेत कचरा पुरला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचऱ्याचे ढीग जेथे दिसतील तेथे पेटवून द्या, जेथे खड्डा असेल तेथे गाडून टाका,असे बेकायदेशीर तंत्र शहरातील चोहोबाजूंनी सुरू झाले आहे. विल्हेवाटीची ही प्रक्रिया शहराचे आरोग्य धोक्यात आणणारी असून, रोजाबाग परिसरातील खुल्या जागेत कचरा पुरण्यास नागरिकांनी विरोध करताच तेथील नगरसेवकाने दांडगाईने त्या परिसरात कच-याचे ट्रक रिकामे केले. ट्रक रिकामे केल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने पूर्ण कचरा तेथे पुरण्यात येत होता. या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. शहरात सर्वत्र कचºयाची विल्हेवाट अशाच पद्धतीने लावली जात असल्याचे दिसते.१६ मे नंतर शहरात रस्त्यावर कचरा पडलेला आढळल्यास आणि १०० टक्के कचरा वर्गीकरण झाला नाही, तर संबंधित वॉर्ड अधिकारी आणि नियंत्रण अधिकाºयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांच्या अखत्यारीत समितीने घेतला आहे. गुरुवारी यासंबंधीचा कार्यालयीन आदेश पालिका प्रशासनाने जारी केला. कचरा समस्या नियंत्रणात आणण्यासाठी ठरलेल्या नियोजनानुसार पालिका प्रशासनाने प्रभागनिहाय वॉर्ड अधिकारी, नियंत्रण अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. शासन आदेशाप्रमाणे कचरा विल्हेवाटीसाठी सात जागांची निश्चिती करण्यात आली आहे.यापैकी चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी या चार ठिकाणी पालिका मालकीच्या जागांवर शहरातील ओला कचरा हलविण्याचे नियोजन केले आहे. तथापि, ११ मे पासून या चार ठिकाणी शहरात रस्त्यांवर पडलेला मिक्स कचरा संकलित करून हलविला जाणार आहे. तेथे या कचºयाचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. १५ तारखेपर्यंत याप्रमाणे कार्यवाही केली जाणार असून १६ मेनंतर रस्त्यांवर कचरा दिसल्यास संबंधित वॉर्ड अधिकारी व नियंत्रण अधिकाºयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय आता विभागीय समितीने घेतला आहे.वॉर्ड अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीसभालचंद्र पैठणे, संपत जरारे या वॉर्ड अधिकाºयांना अतिरिक्त आयुक्त भालसिंग यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच विजय मिसाळ, असदउल्ला खान या स्वच्छता निरीक्षकांनाही नोटीस बजावली आहे.कचरा विल्हेवाटीत हलगर्जी केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका