शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर येणारा कचरा बंद होईना, आता काय करावे? मनपा प्रशासनाचे डोकेच चालेना!

By मुजीब देवणीकर | Updated: December 4, 2023 19:34 IST

आठ वर्षांत इंदौरचे १० अभ्यास दौरे; सर्व उपाययोजनांवर फेरले जातेय पाणी

छत्रपती संभाजीनगर : शहर इंदौरपेक्षाही अधिक स्वच्छ झाले पाहिजे, स्वच्छ भारत अभियानात देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश झाला पाहिजे म्हणून महापालिका तीन महिन्यांपूर्वी संपूर्ण यंत्रणेसह कामाला लागली. ‘हम होंगे कामयाब’ ही टॅगलाइन निश्चित करण्यात आली. त्यानंतरही शहरातील मुख्य रस्त्यांवर, चौकाचौकांत कचऱ्याचे डोंगर साचतच आहेत. कचरा रस्त्यावर येऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. नागरिकच उघड्यावर कचरा आणून टाकत असल्याचे वारंवार समोर येत असल्याने आता काय करावे?; डोकंच चालत नाही, अशी भावना मनपा प्रशासनाची झाली आहे.

देशात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून इंदौर शहराची ख्याती आहे. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी मागील आठ वर्षांत इंदौरचे १० अभ्यास दौरे केले. मात्र, ‘इंदौर पॅटर्न’ची अंमलबजावणी महापालिकेला आजपर्यंत करता आली नाही. दरवर्षी महापालिका प्रशासन यंदा शहर इंदौरपेक्षाही अधिक स्वच्छ व सुंदर केले जाईल. तीन महिन्यांपूर्वी प्रशासनाचे अशाच पद्धतीने कंबर कसली. ओला व सुका कचरा वेगळा करण्यावर भर दिला. त्याला ९० टक्के यशही आले. आता ११५ वॉर्डांमधून ९० टक्के कचरा वर्गीकृत होऊनच येत आहे. १० टक्के नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करायला तयार नाहीत. महापालिका त्यांच्याकडून कचरा घेत नाही. त्यामुळे हे नागरिक रस्त्यावर, दुभाजकामध्ये, खुल्या जागांवर कचरा आणून टाकत आहेत. शहर विद्रुपीकरणात रस्त्यावरील कचरा अधिक भर घालत आहे. पर्यटनाच्या राजधानीला हे दृश्य शोभणारे नाही. झोन क्रमांक १, २, ३ मध्ये रस्त्यावर येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावर कचरा येऊ नये म्हणून जनजागृती केली. दंडात्मक कारवाया केल्या. त्यानंतरही परिस्थिती सुधारणा नाही.

तीन प्रक्रिया केंद्र सुरूहर्सूल, पडेगाव, चिकलठाणा येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाले. त्यामुळे दररोज तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होत आहे. ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती कांचनवाडीत सुरू झाली.

कोट्यवधींचा खर्च तरी...शहरातील कचरा संकलनासाठी रेड्डी कंपनीची नेमणूक केली. दरमहा अडीच ते तीन कोटी रुपये निव्वळ कचरा उचलण्याचा खर्च येतोय. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दरमहा किमान ५० ते ६० लाखांचा खर्च येतोय. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहर स्वच्छ व सुंदर होईना.

शर्थीचे प्रयत्न सुरूरस्त्यावर येणारा कचरा बंद व्हावा, यासाठी महापालिकेने शर्थीचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरू केले आहेत. एक कचऱ्याचे केंद्र बंद झाले तर दुसरीकडे दुसरे नवीन केंद्र तयार होते. जुन्या शहरात आणि शहराच्या आसपास असलेल्या गुंठेवारी भागात हा प्रश्न अधिक जटिल आहे. आम्ही येणाऱ्या काही दिवसांत यावरही मात करणार आहोत.-सोमनाथ जाधव, उपायुक्त, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न