शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कचराकोंडी@९३ : मार्ग निघेना; बैठकांचे सत्र संपेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:34 IST

शहरातील कचराकोंडी ९३ दिवसांपासून फुटत नाहीय. पावसाळा तोंडावर आला असून, बैठकांचे सत्र आणि अधिकाऱ्यांना झापण्यापलीकडे काहीही हाती लागलेले नाही.

ठळक मुद्देकाही प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग कमी झालेले दिसत असले तरी कचरा पेटविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कुठेही कचरा पेटविल्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. 

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी ९३ दिवसांपासून फुटत नाहीय. पावसाळा तोंडावर आला असून, बैठकांचे सत्र आणि अधिकाऱ्यांना झापण्यापलीकडे काहीही हाती लागलेले नाही. सोमवारी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी कचरा समस्या दूर करण्यासाठी आढावा बैठक घेतली. 

काही प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग कमी झालेले दिसत असले तरी कचरा पेटविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कुठेही कचरा पेटविल्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. घनकचरा संनियंत्रण समितीतर्फे  सातत्याने आढावा घेऊन संपूर्णत: कचरा प्रक्रिया आणि  विलगीकरणाबाबत महापालिका यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर समितीद्वारे कचरा समस्येबाबत संपूर्ण माहिती, पार पाडलेल्या कार्यवाहीबाबत महापालिका आयुक्त डॉ.विनायक  निपुण यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आज माहिती दिली.

विभागीय आयुक्त यांच्या दालनात घनकचरा संनियंत्रण समितीची बैठक झाली. कचरा व्यवस्थापन संनियंत्रण समितीने कचरा टाकण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई व्हावी, कचरा समस्या दूर व्हावी यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही समितीने सांगितल्याचे   डॉ.भापकर यांनी आयुक्तांना सांगितले. 

मनपा आयुक्त डॉ. निपुण यांनी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राबवीत असलेल्या आराखड्याची माहिती विभागीय आयुक्तांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

हा सगळा शोध कागदापुरताच चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी, नारेगाव, झाल्टा, मिटमिटा आदी ठिकाणच्या जागा निश्चित केल्या. शहरातील साचलेला कचरा उचलून त्यावर योग्य प्रक्रिया पार पाडून आवश्यक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. मात्र हे सगळे कागदावरच आहे. एकाही जागेवर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक मशिनरी बसविण्यात आलेली नाही. १४८ दिवसांचा अ‍ॅक्शन प्लॅन पालिका १६ फेबु्रवारी रोजी नारेगावातील आंदोलकांना देत होती. त्यातील ९३ दिवस आजवर संपले आहेत. या दिवसांत पालिकेला काहीही करता आलेले नाही. संनियंत्रण समिती बैठका घेण्याशिवाय काहीही करू शकत नसल्यामुळे शहरातील कचरा समस्या तशीच आहे. 

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद