लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील रस्त्यावर पडलेला कचरा दोन दिवसांत उचला, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले. आयुक्तांनी आज सकाळपासून कचरा प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या सात जागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी अधिका-यांची बैठक घेऊन समस्यांची वस्तुस्थिती जाणून घेतली.कचºयाचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे शासनाने येथे पाठविले आहे. सर्वांनी मिळून यावर मार्ग काढावा लागेल. येत्या दोन दिवसांत रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्याचे त्यांनी आदेश दिले. आयुक्तांनी मंगळवारी पदभार घेतल्यानंतर बुधवारी सकाळी अधिकाºयांची बैठक घेतली. दुपारनंतर शहरातील प्रमुख अधिकाºयांच्या भेटीही त्यांनी घेतल्या.कचºयाचा प्रश्न सुटल्यावर पाण्याकडे वळणारकचरा प्रश्न सुटल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या विषयाकडे वळू, असे आयुक्तांनी नगरसेवकांना सांगितले. कचरा प्रक्रियेसाठी निवडलेल्या जागांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी सायंकाळी कचरा समस्येचा वॉर्डनिहाय आढावा घेतला. दोन वॉर्डांसाठी ४५ मिनिटांचा वेळ देऊन त्यांनी नगरसेवकांकडूनही काही सूचना मागविल्या. कचºयाची समस्या सुटण्यासाठी काय केले पाहिजे, असे प्रश्न करीत त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. काही नगरसेवकांनी जागेच्या तर काहींनी पावसाळ्याच्या नियोजनाबाबत समस्या मांडल्या. समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा कसा काढणार असे प्रश्न नगरसेवकांनी केले.डस्टबीनवरून नगरसेवकांची पंचाईतशासनाने डस्टबीन देण्यास बंदी घातल्याने नगरसेवकांची पंचाईत झाली आहे. डस्टबीन देण्याबाबत नगरसेवकांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे. परंतु शासन निर्णयाआधारे आयुक्तांनी बैठकीत डस्टबीन देण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. नगरसेवकांनी स्वेच्छा निधीतून नागरिकांना डस्टबीन देण्याचा निर्णय घेतला होता. काहींच्या वॉर्डातील निविदाही निघाल्या आहेत.जिल्हाधिकाºयांचा वैताग गेलाजिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी १८ एप्रिल ते १५ मेपर्यंत मनपाचे आयुक्तपद प्रभारी म्हणून सांभाळले. त्यांनी महिनाभरात पालिकेत बोटावर मोजण्याइतक्याच बैठका घेतल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगर परिषद हद्दीत कचºयाची विल्हेवाट लावण्याचे यशस्वी प्रयोग झाले.जिल्हाधिकारी येथील कचरा समस्येवर काही तरी तोडगा काढतील, अशी अपेक्षा होती; परंतु त्यांना पालिकेला काहीही वेळ देता आला नाही. मनपा आयुक्तपदाचा पदभार सांभाळणे हे आव्हान असल्याचेही त्यांनी मध्यंतरी स्पष्टपणे सांगितलेहोते.
औरंगाबादच्या रस्त्यांवरचा कचरा दोन दिवसांत उचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:19 IST
शहरातील रस्त्यावर पडलेला कचरा दोन दिवसांत उचला, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले.
औरंगाबादच्या रस्त्यांवरचा कचरा दोन दिवसांत उचला
ठळक मुद्देआयुक्त : कचरा प्रक्रियेसाठी निवडलेल्या जागांची पाहणी