शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बाप्पाच्या निरोपाची जय्यत तयारी; छत्रपती संभाजीनगरातील 'हे' १९ मार्ग दिवसभर वाहतुकीसाठी बंद

By सुमित डोळे | Updated: September 16, 2024 19:28 IST

छत्रपती संभाजीनगरातील मुख्य शहर, सिडको-हडकोच्या मुख्य मिरवणुकीचे १९ मार्ग संपूर्ण दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दहा दिवसांपासून मोठ्या उत्साहात भक्तांच्या सहवासात राहिलेल्या सर्वांचा लाडका बाप्पा आज निरोप घेत आहे. त्याच्या निरोपासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे. मुख्य मिरवणुकी दरम्यानचे १४ तर सिडको हडको व गजानन महाराज मंदिर मार्गावरील ५ मार्ग सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत.

शहरात यंदा गणेश मंडळांची एक हजार पेक्षा अधिक विक्रमी नाेंद झाली. पहिल्यांदाच सर्वाधिक २१ फुटांच्या गणरायाच्या मुर्तीची स्थापना झाली असून ४ मोठ्या मंडळांची नोंदणी झाली. विसर्जनाच्या १४ ठिकाणांवर या सर्व मंडळांची आज उत्साहात मिरवणुक निघणार असून बहुतांश मंडळांकडून ढोल ताशा पथकाचे सादरीकरण केले जाणार आहे. या दरम्यान पोलिसांकडून सकाळी ७ वाजेपासूनच विसर्जन मिरवणुक संपेपर्यंत प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद केले जाणार आहेत. नागरिकांनी या दरम्यान पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शहरातील हे मार्ग राहणार बंद-संस्थान गणपती ते गांधीपुतळा, सिटोचीक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, बळवंतवाचनालय, एस.बी. कॉलेज मार्गे जिल्हा परिषद मैदान.-संस्थान गणपती ते शहागंज चमन, गांधीपुतळा, सिटीचौक, जुनाबाजार मार्गे भडकलगेट.-जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट-मोंढा ते राजाबाजार.-निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज चमन.-भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन-चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजुरपुरा चौक ते गांधीपुतळा.-लोटाकोरंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड.-कामाक्षी लॉज ते सिटीचौक व पुढे गुलमंडी, बाराभाई ताजिया, गोमटेश मार्केट मार्गे पैठणगेट या रस्त्यावरील सर्व पूर्व-पश्चिम दिशेच्या गल्ल्या बंद राहतील.-सिटीचौक पोलीस ठाण्याच्या पश्चिमेकडील बुऱ्हाणी शाळेकडे जाणारा मार्ग.-बुढ्ढीलाईन, जूने तहसिल कार्यालय, जुना बाजार, बारुदगरनाला.-सिल्लेखाना चौक, पैठणगेट, बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटीचौक.-सावरकर चौक, एम.पी. लॉ महाविद्यालय, महात्मा फुले पुतळा बळवंत वाचनालय चौक.-अंजली सिनेमागृह, महात्मा फुले चौक ते बाबुराव काळे चौक.-रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी ते बाबूराव काळे चौक.

सिडको, हडको, गजानन महाराज मंदिर मार्गही बंद-चिश्तीया चौक, अविष्कार चौक, बजरंग चौक, बळीराम पाटील शाळा चौक, ओंकार चौक ते सिडको पोलीस ठाण्यासमोर, एन-७ बसस्थानक, टी. व्ही. सेंटर चौक ते एन-१२ स्वर्ग हॉटेल जवळील विहिरीपर्यंत. त्याशिवाय जिजाऊ चौक ते शरद टी.-चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, टी.व्ही. सेंटरकडे जाणारा रस्ता.-एन १ चौक ते चिश्तिया चौक, सेंट्रल जकात नाका तसेच चिश्तिया चौक ते द्वारकादास शामकुमार साडी सेंटर.-आझाद चौक ते बजरंग चौक, देवगिरी नागरी सहकारी बँके पर्यंत.-सेव्हनहील ते शिवाजीनगर, त्रिमुर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024Policeपोलिस