शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवरील लुडो खेळावर पैसे लावून जुगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 19:37 IST

करमणूक म्हणून पोलिसांचे दुर्लक्ष 

ठळक मुद्देचार जणांमध्ये सतत कुठेही खेळला जातो खेळ

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : मोबाईलच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऑनलाईन खेळ खेळून करमणूक केली जाते; परंतु आॅनलाईन पत्ते आणि आता लुडो नावाने खेळावर पैसे लावून जुगार जोमात सुरू आहे. करमणूक म्हणून पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने शहरात विद्यार्थी, नागरिकांसह जुगारात गुंतलेली अनेक टोळकी दिसत आहेत. 

व्यावसायिक चार मित्र एकत्र येऊन रिकाम्या वेळेत आॅनलाईन लुडो नावाचा चंफूल हा खेळ डाऊनलोड करून खेळताना अनेक जण दिसत आहेत. कुणी त्यांना हटकल्यास टाईमपास म्हणून खेळतोय, भाऊ खेळायचे का, असा प्रतिसवाल ते करतात. लहान मुलांच्या करमणुकीसाठी मोबाईलवर विविध खेळ असले तरी प्रत्येकाला त्यातून काही तरी बहाणा पाहिजे. याप्रमाणे त्या खेळाला जुगाराचे स्वरूप निर्माण करून दिले आहे. रात्री-अपरात्री किंवा हॉटेलवर चार मित्र चहा पार्टी जरी असेल, तर त्यावर खेळून जो हरला त्यावर खर्च लावतात; परंतु आता केवळ पार्टी नव्हे, तर पैसे लावून खेळविला जाणारा जुगार छुप्या मार्गाने शहरात जोरात सुरू झाला आहे. वाहनात प्रवासादरम्यानदेखील हा खेळ सुरू होतो. आॅनलाईन पॉइंट व त्यानुसार पैसे जिंकण्याची चुरस लागते. करमणूक म्हणून खेळता-खेळता आता पैसे लावून जुगार खेळणे सुरू आहे. अनेक जुगारी त्याला कमाईचे साधन समजू लागले आहेत. बौद्धिकतेच्या खेळात सर्वच तरबेज असतात असे नाही; परंतु लक्षपूर्वक खेळून दुसऱ्याला हरविण्यासाठी अधिक जोर लावला जातो. चातुर्याने खेळलेल्या चालीनुसार जास्त पॉइंट मिळून खेळात जिंकतो.

पोलिसांच्या नजरेत हा गुन्हाचपैसे लावून खेळला जाणार हा जुगार पोलिसांच्या नजरेत गुन्हाच आहे. करमणुकीऐवजी पैसे लावून त्या खेळाचा अर्थार्जनासाठी कुणी खेळत असल्यास त्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा प्रकारच्या कारवाया झालेल्या आहेत. रात्रीची गस्त वाढविली असून, तसे कोणी मोबाईलवर आॅनलाईन पैसे लावून खेळ खेळताना आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाणार, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस