शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

'दिल्लीच्या गडकरी राया, खासदार जलीलभैया गोंधळाला या...या...'; वाहतूक समस्यांवर ग्रामस्थांचा जागरण-गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 20:04 IST

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव-औट्रमघाटात दरड कोसळल्याने दोन महिन्यांपासून जड वाहतुकीसाठी घाट बंद आहे.

कन्नड : एरव्ही देवादिकांना जागरण गोंधळाच्या माध्यमातून साकडे घालून धावून येण्याचे आवाहन केले जाते. मात्र, कन्नडमधील औट्रम घाटात ‘दिल्लीच्या गडकरी राया, जागरणाला या या, खासदार जलीलभैया गोंधळाला या या’ असे स्वर आळवून विविध मागण्यांसाठी चक्क लोकप्रतिनिधींना येथे येऊन समस्या सोडविण्याचे आवाहन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आज करण्यात आलेल्या या अनोख्या जागरण गोंधळ आंदोलनाची चर्चा तालुक्यात दिवसभर होत होती.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव-औट्रमघाटात दरड कोसळल्याने दोन महिन्यांपासून जड वाहतुकीसाठी घाट बंद आहे. हा रस्ता सुरू करावा, भुयारी मार्ग पूर्ण करावा, तालुक्यातील जनतेकडून टोल वसुली थांबवावी या मागण्यांसाठी घाटात राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानकडून जागरण-गोंधळ-सत्यनारायण असे गांधीगिरी आंदोलन सोमवारी करण्यात आले. आंदोलनात सकाळी सत्यनारायण पूजा करून नंतर वाघे मंडळाचा जागरणाचा कार्यक्रम रंगला. यावेळी केंद्रीय रस्ते व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवतजी कराड, खा. इम्तियाज जलील यांना गाण्याच्या माध्यमातून जागरणाला येण्याचे साकडे घालण्यात आले. प्रास्ताविक राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सीताराम जाधव यांनी केले. डॉ. प्रशांत अवसोरमल, राजानंद सुरडकर यांची यावेळी भाषणे झाली.

या मागण्यांसाठी केले आंदोलनसोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर आजपर्यंत पाच हजार कोटी खर्च होऊन गेला आहे. मात्र, घाटातील ८ कि.मी. भुयारी रस्ता झाला नाही. तेलवाडीच्या पुढे हे काम थांबविण्यात आले. त्यातच अतिवृष्टीमुळे जुन्या घाट रस्त्यावर दरड कोसळून दोन महिन्यांपासून हा रस्ता जड वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे ही वाहतूक शिऊर बंगला, नांदगाव मार्गे वळवावी लागली. ८ कि.मी. रस्त्याअभावी १२० कि.मी.चा फेरा मारावा लागत असून वेळ, इंधन खर्च वाढला आहे. जनतेकडून करण्यात येणारी टोल वसुली थांबवावी, कामात कुचराई करणाऱ्या रस्त्याच्या गुत्तेदारांवर वन अधिनियमान्वये गुन्हे नोंदवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलील