शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

G20 Summit: विदेशी पाहुण्यांनी घातली महिलांना जग बदलाची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 13:56 IST

जी-२० चा अंतर्गत भाग असलेल्या वूमन्स- २० हा २०१५ मध्ये स्थापन झालेला जगभरातील २० विकसनशिल देशांचा गट आहे.

छत्रपती संभाजीनगर : जी- २० शिखर परिषदे निमित्त शहरात दाखल झालेल्या १९ देशांतील महिलांनी रविवारी स्थानिक महिलांसोबत संवाद साधत ‘चला जग बदलू या’, अशी साद घातली.

एमजीएमच्या रूख्मिणी सभागृहात जनभागिदारी हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे राेहयोमंत्री संदीपान भुमरे, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, महिला- २० परिषदेच्या चेअरपर्सन संध्या पुरेचा, समन्वयक धरित्री पटनायक यांच्यासह आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सुमारे एक हजाराहून अधिक महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महागामीच्या कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यानंतर एमजीएमचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. डॉ. संध्या पुरेचा यांनी प्रास्तविक करताना शिखर परिषदेचे महत्त्व सांगितले. काही वर्षांपासून महिलांचा दर्जा उंचावण्यासाठी ही संस्था काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

शिष्टमंडळाच्या नेत्या डॉ. फराहदिभा टेनारिलेम्बा यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधनाता इंडोनिशयाने स्थापन केलेल्या कार्यक्रमामध्ये भारत सातत्य राखेल, अशी आशा व्यक्त केली. डॉ. टेनरिलेम्बा यांनी महिला-२० परिषदेने इंडोनेशियातील नऊ लाख कोटींहून अधिक महिलांवर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. भारत जगातील विकसनशिल देशांचे नेतृत्व राखेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

रशियाच्या प्रतिनिधी, एलेना म्यकोटनिकोवा यांनी हवामान सक्रियतेचे महत्त्व आणि हवामान बदलाचा सामना करण्याची गरज व्यक्त केली. दक्षिण कोरियाच्या एंजेला जू-ह्यून कांग या भारतातील विविध धर्म आणि एकोपा याबद्दल प्रभावित झाल्या. त्यांनी महिलांना समाजाच्या उन्नतीसाठी प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे नमूद केले. जपानच्या प्रतिनिधी सातोको कोनो यांनी महिलांसाठी उद्योजकतेचे महत्त्व आणि आर्थिक स्वातंत्र्यावर भर दिला.

प्रश्नोत्तराच्या फेरीत जाणून घेतल्या समस्याप्रश्नोत्तराच्या फेरीतून आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने स्थानिक महिलांचे प्रश्न जाणून घेतले. प्राचार्य रेखा शेळके यांनी औरंगाबादेतील महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न उपस्थित केला, तर डॉ. कानन येळीकर यांनी महिलांतील रक्तक्षयांकडे लक्ष वेधले. अन्य एका महिलेने बालविवाह, महिला अत्याचारांच्या घटनांकडे प्रकाश टाकला.

काय आहे डब्ल्यू- २०जी-२० चा अंतर्गत भाग असलेल्या वूमन्स- २० हा २०१५ मध्ये स्थापन झालेला जगभरातील २० विकसनशिल देशांचा गट आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येचा ५० टक्के भाग असलेल्या महिलांच्या समस्या, त्यांचे विविध क्षेत्रातील योगदान, त्यांची भरभराट आणि त्यांच्या विकासातील अडथळे दूर करण्यासाठी ही संस्था काम करते. यंदा भारताकडे जी- २० चे अध्यक्षपद आहे. यानिमित्त जगातील १९ देशांतील महिला प्रतिनिधी शहरात दाखल झाले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार