शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

स्मशानभूमी नसल्याने भर पावसात सरणावर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार; मन हेलावणारी घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:58 IST

स्मशानभूमीसाठी जागा मंजूर होऊनही चार महिने झाले. पण, कागदी घोडे अजूनही धावत आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

छत्रपती संभाजीनगर/ खुलताबाद : स्मशानभूमीवर नसल्याने पडत्या पावसात सरणावर चक्क ताडपत्री पकडण्याची वेळ नातेवाइकांवर आली. हा प्रकार सोमवारी (दि. १) तालुक्यातील खांडी पिंपळगावात पाहायला मिळाला. पडत्या पावसात वारंवार सरण विझत असल्याने १५ लिटरपेक्षा जास्त डिझेलचा वापर करावा लागला. यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.

खुलताबाद तालुक्यातील खांडीपिंपळगाव येथील पांडुरंग शहाजी भालेराव यांचे सोमवारी सकाळी ८:३० वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दलित वस्ती शेजारील एक नातेवाईक कसत असलेल्या गायरान जमिनी परिसरात दुपारी तीन वाजता उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अंत्यसंस्कारावेळी दुपारी तीन वाजता उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अंत्यसंस्कारावेळी दुपारी तीन वाजता पाऊस सुरू झाला. त्यामुळे चार जणांनी जळत्या सरणावर ताडपत्री धरली होती.

स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने गायरान जमीन उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांकडे मागणी केलेली आहे. पथकाने गावात पाहणीही केली, मात्र पुढे काय झाले ते समजलेच नसल्याचे गावातील मिठ्ठ महालकर यांनी सांगितले. गावातील लोक ज्याच्या त्याच्या शेतात अंत्यसंस्कार करतात. मात्र, शेतीच नसलेल्यांची गैरसोय होऊन उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात, असे महेश उबाळे यांनी सांगितले.

जिल्ह्यात २३१ गावांत स्मशानभूमी नसल्याचे आणि ३१० गावांतील स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी अद्याप रस्ता नसल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने रविवारच्या अंकात मांडले. त्यानंतर, खांडेपिंपळगाव येथील मन हेलावणारा आणि प्रशासकीय टोलवाटोलवीचा हा प्रकार समोर आला. पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने, ग्रामीण भागात गैरसोय असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या एका पाहणीतून समोर आले. या सर्वेक्षणात १,३३२ पैकी २३४ गावांत सातबाराला नोंद असताना त्याचा स्मशानभूमी म्हणून वापर होत नसल्याचे समोर आले, तर २३१ गावांत स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार खुल्या जागेवर करावे लागतात.

अन्यथा आंदोलनखांडीपिंपळगाव येथे इतरांना शेतजमिनी आहेत. मात्र, दलित व इतर मागासवर्गीयांना शेतीच नाही. त्यामुळे दलित स्मशानभूमीसाठी लवकरात लवकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा यानंतर तहसील कार्यालयसमोर मृतदेहावर अंत्यसंस्कार करून आंदोलन करण्यात येईल.-प्रवीण इंगळे, सामाजिक कार्यकर्ते

अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नाहीखांडेपिंपळगावमध्ये अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नाही. प्रशासकीय अंमलबजावणी होत नसल्याने ही हालअपेष्टा वाट्याला येत आहे.- सुभाष भालेराव, ग्रामपंचायत सदस्य तथा मृताचे नातेवाईक

चार महिन्यांपूर्वी मंजुरीचार महिन्यांपूर्वी खांडेपिंपळगांव येथे १५ गुंठे जागा गायरान जमिनीतून देण्याचा निर्णय घेतला असून, तशी सातबारावर नोंदही घेतली आहे, परंतु खुलताबाद तहसील व तलाठी पातळीवरील यंत्रणेने या कामासाठी गती दिली नाही.- संतोष गोरड, उपविभागीय अधिकारी

२३१ गावांत नाही स्मशानभूमीतालुक्याचे नाव......गावांची सख्या......स्मशानभूमी नसलेली गावेछत्रपती संभाजीनगर....५९.........................०१ग्रामीण.....................१५३...........................०५पैठण.......................१८९.........................३९फुलंब्री.....................९२...........................१८गंगापूर....................२२६........................४५वैजापूर..................१३५.......................११खुलताबाद.............७४......................१८कन्नड...................१९६.......................३९सिल्लोड..............१२४.....................४२सोयगाव.............८४.........................१३एकूण ..................१३३२....................२३१

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSocialसामाजिक