अतिवृष्टीने वाहून गेलेल्या पाच पुलांसाठी साडेसोळा लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:48+5:302020-12-17T04:27:48+5:30
पैठण तालुक्यातील नांदर वीरभद्रा नदीवरील पूल (८ कोटी), नवगाव पूल (४ कोटी), पिंपरी राजा टाकळी माळी गावाजवळील पूल (२ ...

अतिवृष्टीने वाहून गेलेल्या पाच पुलांसाठी साडेसोळा लाखांचा निधी मंजूर
पैठण तालुक्यातील नांदर वीरभद्रा नदीवरील पूल (८ कोटी), नवगाव पूल (४ कोटी), पिंपरी राजा टाकळी माळी गावाजवळील पूल (२ कोटी ५० लक्ष), कातपूर पूल (१ कोटी), कापूसवाडीचा पूल (१ कोटी) अशा पाच पुलांच्या कामासाठी नाबार्डंतर्गत मंजुरी मिळाली आहे. तर लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले आहेत. मागील काही वर्षांपासून या पुलांची दुरवस्था झालेली होती. त्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे पूल वाहून गेले होते. त्यामुळे गावकरी, वाहनधारकांना मोठा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या पुलांचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. मंत्री भुमरे यांनी जातीने लक्ष घालून पाच पुलांसाठी जवळपास साडेसोळा लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे.